-
नाटक असो वा चित्रपट, मालिका असो वा एखाद्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आपल्या अस्तित्वानेच वातावरण मोकळे करत विविध भूमिकांमध्ये रंग भरणारे अभिनेते प्रशांत दामले.
-
मराठी रंगभूमी तसेच छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारे चतुरस्र अभिनेते प्रशांत दामले यांचा काल ०६ एप्रिल रोजी वाढदिवस होता.
-
त्या निमित्ताने प्रशांत दामले यांच्या कुटुंबीयांनी बर्थडे सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो प्रशांत दामले यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.
-
'ऐन तारुण्यात वाढदिवसाची वाट बघण्याचीही वेगळीच मजा असते. पण पुढे वाढदिवस म्हणजे वयाचा मिटर आणखी एका वर्षानं पुढं सरकवणारा दिवस, असं काहीसं वाटतं. आजची सुरूवात काहीशी अशी झाली, पण तुमच्या शुभेच्छांच्या पावसात मी अक्षरश: न्हावून निघालो. ऐन उन्हाळ्यात मनाला नवी पालवी फुटली. पुन्हा तरुण होऊन मी आजच पुढच्या वाढदिवसाची वाट बघू लागलोय. आयुष्याचं सिंहावलोकन वगैरे करण्यावर माझा विश्वास नाही. पण या विदुषकावर तुम्ही इतका जीव लावला, हेच आयुष्याचं संचित! आणखी काय हवं? शुभेच्छा देणा-या प्रत्येकाला वैयक्तिक भेटायला आवडेल, पण सध्या शक्य नाही. पण भविष्यात नक्कीच भेटुयात. तोपर्यंत सुरक्षित रहा. आनंदात रहा. तुमच्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा खूप खूप आभार!' असे कॅप्शन देत अभिनेते प्रशांत दामले यांनी हे फोटो शेअर केले आहेत.
-
साधे राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे प्रशांत दामले प्रेक्षकांचे लाडके आहेत. प्रशांत दामलेच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल