-
साउथ अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केलाय. 5 एप्रिलला रश्मिकाने तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केला.
-
रश्मिकाचा हा वाढदिवस खूप खास होता. कारण बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिला वाढदिवसाचं सेलिब्रेशन करता आलं.
-
रश्मिका लवकरच बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गूडबाय' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या सेटवर तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सेटवरच्या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोत बिग बींनी मास्क घातल्याचं दिसतंय. तर रश्मिकाने मास्क घातलेलं नाही. यावर तिने कॅप्शनमध्ये स्पष्टीकरण दिलंय. फक्त फोटो काढण्यासाठी मास्क काढला असला तरी सर्वांनी कायम मास्कचा वापर करा असं ती म्हणाली आहे.
-
त्याचसोबत "किती समाधान कारक दिवस आहे" असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. बिग बींसोबत बर्थडे सेलिब्रेट करण्याची संधी मिळाल्याने रश्मिकाचा आनंद द्विगुणीत झाल्याचं दिसतंय. यावेळी दिग्दर्शक विकास बहलसोबत तिने फोटो शेअर केला आहे. (all photo- instagram@ashmika_mandanna)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”