-
सैफ अली खानची बहीण सबा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही जुने फोटो शेअर केले आहेत. यात सैफ, सबा आणि सोहा यांच्या लहानपणीचे काही फोटो आहेत. त्यांचे आई बाबा शर्मिला आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या लग्नातलेही फोटो आहेत. सबाने हे फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. यातला सैफचा फोटो पाहून तर तैमूरचीच आठवण येत आहे. हा सैफ आहे की तैमूर असा प्रश्न पडत आहे. (सर्व फोटोंचे सौजन्यः सबा अली खान इन्स्टाग्राम)
-
आई शर्मिला टागोर आणि वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबत सैफ. "तैमूर सैफची झेऱॉक्स आहे", "सैफची कॉपी पेस्ट" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी या फोटोवर केल्या आहेत.
-
आई शर्मिला टागोर यांच्यासोबत सबा अली खान.
-
लहान बहीण सोहा अली खान हिच्यासोबत सबा अली खान.
-
वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबत सोहा अली खान.
-
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या लग्नातला एक फोटो.
-
'अमरप्रेम' या चित्रपटाच्या प्रीमीयरच्या वेळचा फोटो. यात शर्मिला टागोर यांच्या समवेत सॅम माणेकशा, राजेश खन्ना आणि इतर मंडळी दिसत आहेत. सबाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, हा फोटो काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारत पाकिस्तान युद्ध जाहीर झालं होतं.
-
सत्यजित रे यांच्यासोबत अभिनेत्री शर्मिला टागोर.

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral