-
अभिनेता वरुण धवनची पुतणी अंजिनी धवन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नात अंजिनीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
फोटोग्राफर्सचे कॅमेरा देखील अंजिनीकडे वळाले होते. वरुण नताशाच्या लग्नातील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
स्टारकिड्सच्या यादीत अंजिनीची देखील चर्चा रंगू लागली आहे. अंजिनी सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
-
अजिंनीचा फॅशन सेन्स सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. बऱ्याचदा ती बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
मात्र नुकत्याच शेअर केलेल्या काही फोटोवरून अंजिनी ट्रोल झाली आहे.
-
अंजिनीने नुकतच एक फोटोशूट केलं असून यात तिने डेनिम जीन्स आणि डेनिम शर्ट घातल्याचं दिलसंय.
-
मात्र अंजिनीने एकावर एक दोन जीन्स घातल्याने तिला ट्रोल करण्यात आलं आहे. एका युजरने तिला "तुला गरम होत नाही का?" असा सवाल विचारला आहे.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली आहे,"फोटोशूट दरम्यान एक डुलकी मारण्याची संधी." या कॅप्शनवरूनही तिला ट्रोल व्हावं लागलं आहे.
-
एका युजरने "असं कोणं झोपत?" असा प्रश्न विचारत तिला ट्रोल केलंय. त्याच सोबत एकाने म्हंटलं आहे, "खाली दोन जीन्स आणि वरती अर्ध शर्ट काय कॉम्बिनेशन आहे. "
-
अंजिनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या फोटोंवर अनेक नेटकरी लाईक देताना दिसतात. (all photo-instagram@anjinidhawan)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण