-
आपल्या क्यूट स्माईलने अनेकांच्या मनावर एकेकाळी राज्य करणाऱ्या अभिनेत्री आयेशा टाकियाचा आज 35 वा वाढदिवस आहे. आयशाने अगदी कमी वयापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. अभिनयाच्या जोरावर तिने चांगली लोकप्रियता देखील मिळवली. मात्र लग्नानंतर अचानक तिने बॉलिवूडकडे पाठ फिरवली.
-
पंधरा वर्षाची असतना आयशाने 'सोचा ना था' सिनेमा साइन केला होता. त्याचसोबत ती फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चुनर उड़ उड़ जाए’ या गाण्यातही झळकली. हे गाणं त्यावेळी चांगलंच लोकप्रिय झालं होतं.
-
2004 सालात प्रदर्शित झालेल्या 'टारझन' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या सिनेमासाठी तिला फिल्म फेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता.
-
2006 मध्ये आलेल्या 'डोर' य़ा सिनेमातील आयशाच्या अभिनयाचं कौतुक झालं. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
-
यासोबतच तिने ‘शादी नंबर 1’, ‘होम डिलीवरी’, ‘शादी से पहले’, ‘यूं होता तो क्या होता’, ‘सलाम ए इश्क’ अशा काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
-
सलमान खानसोबत आलेला आयेशाचा 'वॉण्टेड' सिनेमा तर सुपरहिट ठरला.
-
2009 मध्ये आयशाने प्रियकर फरहान आजमीसोबत लग्नगाठ बांधली. यावेळी ती 23 वर्षांची होती. यावेळी तिच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. फरहानशी लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्विकारल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर आयेशाने मात्र बोलणं टाळलं.
-
लग्नानंतर आयशाने बॉलवूडकडे पाठ फिरवली. त्यानंतर एका कार्यक्रमात तिला स्पॉट करण्यात आलं. यावेळी आयशाचं बदललेलं रुप पाहून अनेक जण थक्क झाले. आयेशाने ओठांची, गालांची आणि भुवयांची सर्जरी केल्याचं पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं.
-
सर्जरी बिघडल्याने आयशाचा लूक बदलला अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र आयशाने सर्जरी केल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला नाही.
-
आयशाला मिकेल नावाचा मुलगा आहे. बॉलिवूडपासून दूर झाली असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र आत्ताचा आयशाचा लूक इतका बदलला आहे की बऱ्याचदा तिला ओळखणं कठीण होतं. (all photos-instagram@ayeshatakia)

AFG vs AUS: अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झाला रद्द, कोणत्या संघाने गाठली सेमीफायनल?