-
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेला शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते.
-
‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अनेक चित्रपटांचं प्रमोशन या शोच्या मंचावर झालं आहे. त्यामुळे हा शो विशेष लोकप्रिय आहे.
-
आता या शोचे नवीन पर्व हे मे महिन्या पासून सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नवीन पर्वात आपल्याला आणखी काही नवीन विनोदवीर दिसणार आहेत. या शोच्या प्रत्येक कलाकाराला एक-एक भागाचे लाखो रुपये मिळते. चला जाणून घेऊया प्रत्येक कलाकाराला एका भागाचे किती पैसे मिळतात…
-
कपिल शर्मा – कपिल हा या शोचा सुत्रसंचालक आहे. कपिल हा कॉमेडी किंग म्हणून ओळखला जातो. कपिलला एका एपिसोडसाठी ३० ते ३५ लाख रूपये मिळतात. तर, येत्या नवीन पर्वासाठी तो एका एपिसोडसाठी ५० लाख रूपये घेणार असल्याची चर्चा आहे. ( Photo credit : Kapil Sharma Instagram)
-
कृष्णा अभिषेक – कृष्णाला एका एपिसोडचे १० ते १२ लाख रुपये मिळतात. ( Photo credit : Krushna Abhishek Instagram)
-
भारती सिंग – छोट्या पडद्यावरील कॉमेडि क्वीन म्हणून भारती ओळखली जाते. भारती कपिल शोच्या एका एपिसोडसाठी १० ते १२ लाख रूपये घेते. ( Photo credit : Bharti Singh instagram)
-
अर्चना पूरन सिंग – या कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धुची जागा घेणाऱ्या अर्चना पूरन सिंग एका एपिसोडसाठी १० लाख रुपये घेते. ( Photo credit : Archana Puran Singh Instagram)
-
चंदन प्रभाकर – कपिलच्या शोमध्ये चहावाला चंदु म्हणून प्रसिद्धी मिळालेला चंदन एका एपिसोडसाठी ७ लाख रूपये घेतो. ( Photo credit : Chandan Prabhakar Instagrm)
-
-
किकु शारदा – कपिलच्या शो मधील पलक आणि बच्चा यादव ही भूमिका साकारणाऱ्या किकुला एका एपिसोडसाठी ५ लाख रूपये मिळतात. ( Photo credit : Kiku Sharda Instagram)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स