-
अभिनेत्री, मॉडेल लिसा हेडन आता तिसऱ्यांदा आई होणार आहे. बाळाचा जन्म आता केवळ १० आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. लिसाने आपल्या प्रेग्नंसीचा प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुपरमॉम लिसा आपल्या बेबी बम्पसह आपलं आईपण मिरवताना दिसत आहे.
-
तिने आपला मुलगा लिओ याच्यासोबतचा बीचवरचा एक फोटो शेअर केला आहे. लिओचा जन्म फेब्रुवारी २०२० मध्ये झाला होता.
-
नारंगी रंगाची बिकीनी आणि डोक्यावर हॅट अशा लूकमध्ये लिसा फारच ग्लॅमरसपणे आपला बेबी बम्प कॅरी करताना दिसत आहे.
-
बीचवर निवांत क्षणी एन्जॉय करतानाचे हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
एका प्ले डेटसाठी तयार होताना लिसा.
-
आपल्या बेबी बम्पला साजेसा असा पोशाख परिधान करून लिसा स्टायलिशपणे सगळीकडे मिरवत आहे.
-
लिसा सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
लिसाने आपल्या हाँगकाँगचे फोटोही थ्रोबॅक म्हणत शेअर केले आहेत.
-
सर्व फोटो सौजन्यः लिसा हेडन इन्स्टाग्राम

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश