-
10 आणि 11 एप्रिलला बाफ्टा अवॉर्डच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा जलवा पाहायला मिळाला. या सोहळ्यातील दोन वेगवेगळ्या लूकमधला प्रियांकाचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
या सोहळ्यात प्रियांका प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती. पती निक जोनससोबत प्रियांकाने रेड कार्पेटवर एण्ट्री करत यावेळी अनेकांचं लक्ष वेधल.
-
BAFTA 2021 च्या या खास सोहळ्यासाठी प्रियांकाने काळ्या रंगाचा फिशकट स्कर्ट परिधान केला होता.यावर तचिने विविधरंगी फुलपाखराचं वर्क असलेलं जॅकेट पिरधान केल्याने शोभा आणखीनच वाढल्याचं दिसत होतं.
-
या ड्रेससाठी प्रियांकाने हटके स्टाइलची वेणी बांधून केशभूषा केली होती. तर डार्क रेट लिप्सिटकमध्ये प्रियांचा लूक बोल्ड दिसत होता. रोनाल्ड व्हान डेर केम्प यांनी प्रियांकाचा हा ड्रेस डिझाइन केला होता.
-
प्रियांकाने बोटांमध्ये बऱ्याच हिऱ्यांच्या अंगठ्या घातल्याचं दिसतंय. तर या लूकसाठी तिने खास काळ्या पांढऱ्या रंगाची नेलपेंट लावली आहे.
-
तर निक जोनस देखील टक्सीडो मध्ये उठून दिसत होता.
-
प्रियांकाचा दुसरा लूक पर्टेगाझ या स्पॅनिश डिझायनरने डिझाइन केला आहे. गुलाबी रंगाचं फुलांची एब्रोडरी असलेलं जॅकट आणि पांढऱ्या रंगाची धोती पॅण्ट असा हा प्रियांकाचा लूक उठून दिसतोय.
-
ओपन कट असलेल्या गुलाबी जॅकेटमध्ये तिने गळ्य़ात एक चैन घातली असून या बोल्ड लूकची सध्या मोठी चर्चा रंगतेय.
-
निक आणि प्रियांकाने बाफ्टा अॅवॉर्ड सोहळ्यात रेड कार्पेटवर ग्रॅण्ड एण्ट्री करत साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं.
-
प्रियांका चोप्राने तिचे हॉट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना अवघ्या काही तासातं लाखों लाईकस् मिळाले आहेत.
-
सोशल मीडियावरही हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. (all photo-instagram@priyankachopra)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश