-
आपल्या सुरांच्या जादूने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेया घोषालने आजवर लाखो चाहत्यांना तिच्या संगीताने भुरळ घातली आहे. श्रेया लवकरच आई होणार आहे.
-
सोशल मीडियावरून श्रेया घोषालने ती आई होणार असल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती.
-
त्यानंतर श्रेयाने नुकतेच तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला डोहाळ जेवणाचं खास सरप्राइज दिलं आहे.
-
श्रेयाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हंटल आहे, "जेव्हा तुमच्या मैत्रिणी दूरुनच तुमचे लाड पुरवतात. माझ्या गोड ‘बावरि’ज कडून ऑनलाइन सरप्राईज बेबी शॉवर." असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटल आहे.
-
श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला सरप्राईझ देत ऑनलाईन डोहाळेजेवण आयोजित केलं होतं. तिच्या मैत्रिणींनी खास तिच्यासाठी बनवलेले पदार्थही तिला पाठवले होते.
-
श्रेयाने विविध पदार्थांनी भरलेल्या ताटाचा फोटदेखील शेअर केला आहे.
-
श्रेयाने मैत्रिणींनी खास पदार्थ बनवून पाठवल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. तसचं " आम्ही खेळ खेळत मजा केली. मी किती लकी आहे." असं श्रेया म्हणाली आहे.
-
अनेक वर्षांच्या अफेअरनंतर श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. श्रेयाचा पती मुंबईतील एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहे.
-
मार्च महिन्यात श्रेयाने आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती.
-
. “ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात छान भावना आहे. मी आयुष्यातल्या सर्वात सुंदर काळात आहेत. खरंच हा देवाचा चमत्कार आहे.” असं म्हणतं तिने ही गोड बातमी दिली होती.(all photos- instagram@shreyaghoshal)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल