-
'हॅरी पॉटर' या सिनेमात पद्मा पाटीलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अफशान आझादने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. अफशान लवकरच आई होणार आहे.
-
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अफशानने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. " सगळ्यांसाठी सिक्रेट खुलं करत आहे. लवकच मी आई होणार आहे. अल्लाहने आम्हाला सुंदर भेट दिल्यामुळे मी त्याचे आभार मानते." अशा आशायचं कॅप्शन देत तिने पती नाबील काझीसोबत एक फोटो शेअर केलाय.
-
तर दुसऱ्या फोटोत अफशानने सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त केले आहेत. "तुमच्या सर्वाचे आशिर्वाद आणि प्रेमासाठी खूप आभार. बेबी काझीला आतापासून प्रेम मिळालं आहे." असं ती म्हणाली आहे.
-
अफशानच्या फोटोवर तिला अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
2005 सालात आलेल्या 'हॅरी पॉटर गॉब्लेट ऑफ फायर' या सिनेमातून तिने अभिनयाला सुरुवात केली.
-
'हॅरी पॉटर' या गाजलेल्या सिनेमाच्या पाचही भागांत पद्मा पाटील या भारतीय मुलीची भूमिका अफशानने साकारली.
-
2018 मध्ये अफशान आणि नाबीलने लग्नगाठ बांधली.
-
अफशान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
तसचं अफशान अनेकदा तिचे भारतीय लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. भारतीय लूक आवडत असल्याचं तिने तिच्या काही पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
-
अफशानचं यूट्यूब चॅनलदेखील आहे. यावरून ती फॅशन आणि इतर अनेक टीप्स देत असते. (all photos- instagram@afshanazad)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार