-
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
गायत्री तिचे अनेक वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच गायत्रीने गुढीपाडव्याचं निमित्त साधत काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
क्रिम कलरची साडी, गुलाबी रंगाचं ब्लाउज आणि केसात माळलेला गजरा असा हा गायत्रीचा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
-
हे फोटो शेअर करत गायत्रीने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
-
गायत्री लवकरच 'बाबू' या सिनेमात झळकणार आहे.
-
या सिनेमात गायत्री अभिनेता अंकित मोहनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
-
काही दिवसांपूर्वीच गायत्रीने एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिचा शालेय दिवसातील फोटो तिने शेअर केला होता.(photo- gayatridatarofficial)

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ