-
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खानची आहे. करीना आणि तिची सासू अभिनेत्री शर्मिला टागोर यांची जोडी देखील तितकीच लोकप्रिय आहे.
-
शर्मिला टागोर या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. what women want with kareena kapoor khan या शो मधील त्यांची मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यात करीना आणि शर्मिला टागोर यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली.
-
त्या व्हिडीओमध्ये करीना म्हणाली, "संपूर्ण जगात ज्या काही सुंदर अभिनेत्री आहेत. त्यांच्या पैकी म्हणजे शर्मिला आहेत."
-
मला शर्मिला टागोर यांच्यासारखी सासू मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते.
-
शर्मिला टागोर या फक्त त्यांच्या मुलाची आणि नातवांची काळजी घेत नाही तर त्या त्यांच्या सुनेची सुद्धा तेवढीच काळजी घेतात.
-
"घर आणि काम हे एकत्र सांभाळणं तुमच्या साठी किती कठीण होतं?" असा प्रश्न करीनाने शर्मिला यांना विचारताच शर्मिला म्हणाल्या, "मी त्यावेळी कमी चित्रपट करायची."
-
"मी 'खिलौना', 'हाथी मेरा साथी', 'तेरे मेरे सपने' सारखे अनेक चित्रपट केले नाही. २४ तासात आपण काय काय करणार, आमच्या डबलशिफ्ट असायच्या, आम्ही ७ ते २ आणि २ ते १० असं काम करायचो. मी ६.३० नंतर काम करणार नाही सांगितलं होत."
-
पुढे त्या म्हणाल्या, "आपली इंडस्ट्री ही पुरूषप्रधान आहे. त्यामुळे त्यांच्यावर सगळं अवलंबून होतं, आणि त्यावेळी शशी कपूर आणि अमिताभ बच्चन हे दोघेच वेळेवर यायचे, "
-
"आम्ही फक्त अभिनेत्यांना बोलायचो की कृपया तुम्ही ११ वाजता सेटवर येणार का? तर आपण ११ वाजे पासून तयार होऊन बसायचं आणि ते अभिनेते २ वाजता हसत हसत सेटवर यायचे,"
-
"त्यात आपण आया म्हणून कोणाला ठेऊ शकतो. मात्र, त्या देखील त्यांच्या मुलांना सोडून आपल्या मुलांना सांभाळायला येतात,"
-
"आपल्या इथे पुरूष प्रधान संस्कृती असल्याने आपल्या इथे स्त्रीया मुलांची काळजी घेण्यासाठी घरी थांबतात, त्यांचे पती नाही,"
-
"त्यात एखादी स्त्री जर मुलांना घरी सोडून कामावर गेली तर ती चांगली स्त्री नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांना एक चांगली स्त्री व्हायच आहे,"
-
"मुलगी आणि सुनेत काय फरक आहे?" असा प्रश्न करीनाने त्यांना विचारला असता शर्मिला म्हणाल्या, "मुलगी म्हणजे जी आपल्या सोबत लहानाची मोठी होते. जिच्या स्वभावाबद्दल आपल्याला माहित असतं. तिला काय आवडत आणि तिला काय आवडतं नाही हे आपल्याला सगळं माहित असतं'"
-
"तर सुन, आपण तिला ती मोठी झाल्यावर भेटतो. आपल्याला तिच्या स्वभावाबद्दल काही माहित नसतं, तर तिला समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ लागतो."
-
"जेव्हा एक नवीन मुलगी आपल्या घरात येते. तेव्हा ती पहिल्यांदा आपल्या घरात येते. तर आपण तिचे स्वागत केले पाहिजे," अशा अनेक गोष्टींवर शर्मिला टागोर आणि करीनाने चर्चा केली आहे.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित