-
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर आणि नवाब सैफ अली खानची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांमध्ये असलेलं प्रेम हे सगळ्यांना दिसतं. मात्र, या आधी सैफ आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी अमृता यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. त्या दोघांची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे.
-
१९९९ मध्ये सैमी गॅरवालच्या शोमध्ये अमृता आणि सैफने त्यांच्या प्रेमाची संपूर्ण कहाणी सांगितली होती. या दोघांची पहिली भेट ही राहुल रवैलच्या चित्रपटा दरम्यान झाली होती.
-
राहुल आणि अमृता खूप चांगले मित्र होते. त्यामुळे चित्रपटाच्या स्टारकास्टच्या फोटोशूटला राहुलने अमृताला बोलावले. त्यावेळी सेटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत सैफ एका होस्ट सारखं वागतं होता.
-
फोटोशूटच्या दरम्यान, सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला आणि अमृताने तेव्हाच सैफचे निरीक्षण केले. अमृताला वाटले होते की असा हात ठेवून सैफने हिंमतच काम केलं आहे.
-
हे फोटोशूट तर लगेच संपले मात्र, सैफच्या मनात अमृताने लगेच जागा केली होती. फोटोशूट नंतर सैफ स्वत:ला अमृतापासून लांब ठेवू शकला नाही आणि त्याने अमृताला कॉल केला.
-
फोन करून सैफने अमृताला डिनरसाठी बोलवले. तर, अमृता म्हणाली की, "मी डिनरला बाहेर जात नाही. पण, तुला पाहिजे तर तु माझ्याघरी डिनरसाठी येऊ शकतोस," हे ऐकताच सैफ अमृताच्या घरी गेला.
-
या बद्दल बोलताना सैफ म्हणाला, "मी तिथे कोणत्याही प्रकारच्या आशेने गेलो नाही. मला तिच्या सोबत थोडा वेळ व्यथित करायचा होता. तर तिला थोडं जाणून घेण्याची माझी इच्छा होती," जेव्हा सैफ तिच्या घरी पोहोचला तेव्हा अमृताने मेकअप केला नव्हता. तरी सुद्धा अमृता नेहमी सारखीच सुंदर दिसत होती.
-
मात्र, सैफ येणार हे माहित असून अमृताने सुंदर कपडे परिधान केले नाही, ना तिने मेकअप केला. हे पाहून सैफला वाईट वाटले होते. यावरून स्पष्ट झाले होते की अमृताला सैफ आवडत नाही.
-
सैफला पाहताच क्षणी अमृताला समजलं होतं की सैफला ती आवडते. तर अमृताने लगेच स्पष्ट केले आणि म्हणाली, "जर तू हा विचारकरून इथे आला आहेस की आपल्यात काही होईल तर, अस काही नाही आहे. त्यामुळे तो शांत रहा."
-
हे ऐकूण सैफ आश्चर्यचकीत झाला आणि म्हणाला की, "तू आतून खूप मऊ आहेस, मग बाहेरून इतकी कठोर का राहतेस…त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या."
-
याच दरम्यान त्यांनी पहिल्यांदा kiss केलं. लिपलॉकनंतर सैफने त्याच्या मनातली गोष्ट अमृताला सांगितली आणि म्हणाला की, "माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे ऐकूण अमृता म्हणाली, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते."
-
सैफ पुढचे दोन दिवस अमृताच्या घरून निघाला नाही. जेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे सारखे फोन येऊ लागले, तेव्हा सैफने सेटवर जाण्याता निर्णय घेतला.
-
त्याचवेळी अमृता सैफच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती, आणि सैफने घरातून बाहेर जावे अशी तिची इच्छा नव्हती. यावर बोलताना अमृता म्हणाली, "सैफने त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने माझ्याकडे १०० रूपये मागितले होते." मग अमृताने त्याला १०० रुपये घेण्यापेक्षा माझी गाडी घेऊन का जात नाही असे विचारले.
-
यावर सैफ म्हणाला, "प्रोडक्शनची गाडी? मला त्याची गरज नाही." तर यावर अमृता म्हणाली की, "हे माझ्यासाठी बरोबर नाही कारण माझी गाडी परत द्यायला तो नक्कीच परत येईल," खरं तर तिला पुन्हा एकदा सैफला भेटायचे होते. तिला पुन्हा एकदा सैफला तिच्या घरी पाहायचे होते.
-
सैफने या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो अमृताच्या घरी राहत होता, तेव्हा अमृताची आई अचानक तिथे आली. आईला पाहून अमृता घाबरली आणि म्हणाली, "तू निघून जा, नंतर ती थांबली आणि म्हणाली, एवढं सांग की तू इथे जेवायला आलेलास."
-
पुढे तो म्हणाला की, "तिची आई आली आणि त्यांनी विचारले की इथे कोणी राहतं का? आणि तो तू आहेस का?"
-
हे ऐकूण सैफ आश्चर्यचकित झाला. कारण अमृताने सैफचे संपूर्ण सामान तिथून काढून टाकले होते. कदाचित अमृताचा चेहरा पाहून तिच्या आईला हे जाणवलं असेल. या दोघांची लव्हस्टोरी ही आजही त्यांच्या चाहत्यांच्या लक्षात आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO