-
बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियवर अनेकांनी करण जोहरला सुनावत कार्तिकला पाठिंबा दिला. त्याला पाठिंबा देत बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगनाने ट्वीट केलं होतं.
-
कंगनाने कार्तिकला पाठिंबा देत करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शनवर निशाणा साधला. यावेळी सुशांतच्या मृत्यूवर केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगनाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
-
‘कार्तिक आर्यन मेहनत करुन इथपर्यंत पोहोचला आहे आणि तो असाच पुढे जात राहिल. माझी पापा जो आणि नेपो गँगला फक्त एकच विनंती आहे कृपया त्याला एकटं सोडा. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे त्याच्या मागे लागून आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त करू नका’ या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. या सोबत कंगनाने धर्मा प्रोडक्शच्या अधिकृत स्टेमेंटचा फोटो देखील या ट्विटसोबत शेअर केला आहे.
-
कंगना कार्तिकच्या समर्थन करत आणखी एक ट्विट केले. ती म्हणाली, 'कार्तिक अशा चिल्लर लोकांना घाबरण्याची गरज नाही. काही आर्टिकल प्रकाशित करुन आणि काही घोषणा करुन हे लोकं तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नंतर या सर्व गोष्टींना तुच जबाबदार आहेस असं सांगून स्वत: मौन राहतील. त्यांनी सुशांतला ड्रग्जचे व्यसन आहे आणि वागणूक व्यवस्थित नसल्याच्या अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या.'
-
कंगना इथेच थांबली नाही तर कंगनाने आणखी एक ट्विट केले. कंगना म्हणाली, 'कार्तिक तू घाबरु नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्या लोकांनी तुला कधी मदत केलेली नाही अशी लोकं तुला तोडू शकत नाहीत. आज तुला एकटं वाटत असेल आणि टार्गेट केल्यासारखे देखील वाटत असेल. पण अजीबात असं काही वाटून घेऊ नकोस', सगळ्यांना या ड्राम क्वीन जो बद्दल माहिती आहे.'
-
कंगनाचे हे सर्व ट्विट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला,'आत्महत्या केली? का? खरोखर? असं तू का म्हणालीस? जर तुला खरोखरच न्याय पाहिजे असेल तर तू असे का बोलशील? त्याने गळफास लावला?'
-
'सगळीकडे संधी शोधणारी बाई कंगना..ऐक आणि समजून घे सुशांतची हत्या झाली होती. एनसीबीने रियाच्या जामीनेला आव्हान केले आहे,' अशा आशयाचे ट्वीट दुसऱ्या नेटकऱ्याने केले आहे.
-
एक नेटकरी म्हणाला, 'वेळेचे चक्र पुन्हा एकदा फिरेल. आणि कंगना तुझा अभिमान देखील तुटेल! कर्म कोणालाच सोडत नाही! सुशांतला न्याय मिळू नये म्हणून तू हे करतेस, लवकरच हे तुझ्या सोबत होईल. एनसीबीने रियाच्या जामीनेला चॅलेंज केले आहे.'
-
एक नेटकरी म्हणाला,'कंगना काकू १८० डिग्रीचा यु टर्न. तू स्वत: आधी सुशांतची हत्या करण्यात आली अस म्हणाली होतीस. आता आत्महत्या केल्याची खोटी बातमी तुला कोणी सांगितली..? पप्पूची टोळी आणि पेंग्विन पेंग्विन टोळी बरोबर आहे. तुला लाज वाटली पाहिजी सुशांतची हत्या करण्यात आली होती, तुझे शब्द परत घे आणि माफी माग. एनसीबीने रियाच्या जामीनेला आव्हाहन केले आहे.'
-
'पापा जो बद्दल तर सगळ्यांना माहित आहे. पण, ज्याला धमकावले जाते त्याला बोलणं गरजेचे आहे. एसएसआरने आत्महत्या केली नाही, त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. कृपया तुझे वक्तव्य दुरुस्त कर,'असे तिसरा नेटकरी म्हणाला.

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य