-
अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
'ती माझ्याहून मोठी आहे. त्यामुळे माझ्या सारखा व्यक्तीसोबत राहण्यासाठी तिच्यात असलेला समजुतदारपणा हा खूप महत्त्वाचा असतो.'
-
अर्जुन आणि मलायकाने २०१९ मध्ये त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कळवले होते. (Photo credit : malaika arora instagram and anshula kapoor instagram)
-
-
'ती मला समजून घेते. माझ्या सोबत राहणं सोप नाही. त्यामुळे तिच्यात असलेला संयम खूप महत्त्वाचे वाटते. तिच्यात परिपक्वता आहे, ज्याची मला कधी कधी गरज वाटते.'
-
हे दोघे बऱ्याच वेळा एकत्र दिसतात. एकमेकांसोबत सुट्टी मिळाली की फिरायला जातात. अर्जुनचे तर मलायकाच्या कुटुंबासोबत आणि तिच्या मुलासोबत एक चांगले नाते आहे.
-
मलायकाची कोणती गोष्ट आवडते असा प्रश्न विचारता अर्जुन म्हणाला, 'जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो. तेव्हा त्याच्यातील फक्त एक गोष्ट सांगण हे कठीण असतं.'
-
मात्र, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. तर अनेक वेळा दोघांमध्ये असलेला वयाच्या फरकामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.
-
अर्जुन आणि मलायकाची जोडी ही सगळ्यांना आवडचे. एकदा लाइव्ह सेशन सुरू असताना अर्जुनला एक नेटकरी म्हणाला, 'मलायकाशी लग्न कर'.
-
त्याला उत्तर देत अर्जुन म्हणाला, 'या बद्दल मी विचार केलेला नाही किंवा ठरवलेलं नाही. पण काही असेल तर मी कधी लपवणार नाही.'

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ