-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. करिश्मा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
करिश्मा सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. तिथला एक फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
-
याच फोटोवर कमेंट करत अनेकांनी करिश्माला ट्रोल केले आहे.
-
या फोटोमध्ये करिश्माने प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. तर ती बुलेटच्या जवळ उभी असल्याचे दिसत आहे.
-
या फोटोवर अभिनेत्री रिचा चड्ढाने कमेंट करत करिश्माला टोला लगावला आहे. 'मास्क परिधान कर', अशी कमेंट रिचाने केली आहे. रिचाच्या कमेंटवर करिश्माने लगेच उत्तर दिले. करिश्मा म्हणाली, 'मॅडम मी माझ्या प्रायव्हेट व्हिलामध्ये आहे, सार्वजनिक ठिकाणी नाही.'
-
मात्र, या कमेंट नंतर करिश्मा ट्रोल झाली आहे. एक नेटकरी करिश्माची खिल्ली उडवत म्हणाला, 'मास्क परिधान करून घे तसं पण आपल्याकडे एकच करिश्मा आहे.'
-
दुसरा नेटकरी म्हणाला, 'हिचा व्हिला हा अंतराळात आहे. करोना तिथे कसा पोहोचेल.'
-
आणखी एक नेटकरी म्हणाला, 'करोनाला काय समजतं काय प्रायव्हेट आणि काय सार्वजनिक.'
-
दुसरा नेटकरी म्हणाला, 'जर तर प्रायव्हेट व्हिलामध्ये आहेस, तर तुझा फोटो कसं कोण काढतं आहे.'
-
पुढे एक नेटकरी म्हणाला, 'मोदीजी म्हणतात की करोना हवेतून पसरत आहे. त्यांना पण ही गोष्ट समजवून द्या म्हणजे देश तरी वाचेल.' (Photo credit : karishma tanna instagram)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त