-
बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघे ही बॉलिवूडमधील टॉपचे कलाकार आहेत.
-
हे दोघेही अनेक ब्रॅंडचे ब्रॅंड अम्बॅसिडर आहेत. त्यात दीपिका ही बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तर रणवीर देखील बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
'प्युअरनेटवर्थ'ने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाला वर्षभरात कमीत कमी २५ कोटी रुपये मिळतात. तर, 'रिपब्लिक टीव्हि'ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन वर्षांपासून दीपिकाची संपत्ती ही दरवर्षी ४० टक्केने वाढते. दीपिकाची एकूण संपत्ती ही ५० मीलियन डॉलर इतकी आहे.
-
दीपिका एका चित्रपटासाठी १० -१२ कोटी रुपये घेते. कोणत्याही ब्रँडची ब्रँड अम्बॅसिडर होण्यासाठी ती ८ कोटी रूपये घेते.
-
दीपिकाला प्रत्येक महिन्याला ३० चित्रपटांच्या ऑफर्स येतात. ती एका महिन्याला २ कोटी रूपये कमवते.
-
दीपिकाकडे ऑडी A8, रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या असंख्य महागड्या गाड्या आहेत.
-
दीपिका समाजसेवा देखील करते. तिने महाराष्ट्रातील एक गाव दत्तक घेतले आहे. दीपिकाने ऑल अबाऊट यु, के ए एंटरटेन्मेंट या कंपनींमध्ये गुंतवणूक केलेली असून या तिच्या कंपनी आहेत.
-
रणवीर सिंगची एकूण संपत्ती ही २०७ कोटींची आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
रणवीर एका वर्षात ३० कोटी रूपये कमवतो. दरम्यान, रणवीर एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपये आकारतो.
-
रणवीरकडे महागड्या गाड्या आहेत. अॅस्टन मार्टिन रॅपिड, जग्वार एक्सजेएल, टोयोटा लँड क्रूझर प्राडो, मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज बेंझ जीएलएस या सगळ्या गाड्यांची किंमत ही ७० लाखापासून ३.२९ कोटीं पर्यंत आहे. एवढंच नव्हे तर रणवीरकडे ६८ लाखांचे शू कलेक्शन आहे.
-
रणवीरचा मुंबईच्या ब्युमोंडे टॉवर्समध्ये सी फेसिंग अपार्टमेंट आहे. याची किंमत १५ कोटी रुपये असून गोरेगाव येथे १० कोटींची आणखी एक प्रॉपर्टी आहे. एवढंच नाही तर गोवा मध्ये जवळपास ९ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
-
दरम्यान, दीपिका आणि रणवीरची एकत्र ३१० कोटींची एकूण संपत्ती आहे. (Photo credit : deepika padukone instagram and ranveer singh instagram)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त