-
राज्यातील करोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून यामध्ये २२ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या कोणत्या मालिकेचं शूटिंग कुठे सरु आहे?
-
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत पुढील भागांचं चित्रीकरण गोव्यात करणार आहेत.
-
'रंग माझा वेगळा' या मालिकेचंसुद्धा पुढील भागांचं चित्रीकरण गोव्यात करणार आहेत.
-
'आई कुठे काय करते' या मालिकेतील कलाकार चित्रीकरणासाठी सिल्वासामध्ये दाखल झाले आहेत.
-
'स्वाभिमान' या मालिकेतील कलाकार चित्रीकरणासाठी सिल्वासामध्ये दाखल झाले आहेत.
-
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील कलाकार चित्रीकरणासाठी राजकोटमध्ये दाखल झाले आहेत.
-
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेचं संपूर्ण शूटिंग सिल्वासा येथे होणार आहे.
-
'मुलगी झाली हो' या मालिकेच्या शूटिंगला सिल्वासामध्ये सुरूवात झाली आहे.
-
'सांग तू आहेस का' या मालिकेत पुढील भागांचं चित्रीकरण सिल्वासामध्ये करणार आहेत.
-
मराठीसोबतच हिंदी मालिकांचंही शूटिंग महाराष्ट्राबाहेर केले जाणार आहेत. कुंडली भाग्य आणि कुमकुम भाग्य या मालिकांचं पुढील शूटिंग गोव्यात होणार असून इमली, अनुपमा आणि मेहंदी है रचने वाली या मालिकांचं शूटिंग हैदराबादमध्ये होत आहे.

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ