-
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा आज वाढदिवस आहे.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत.
-
'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमातून चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये शर्मिष्ठा झळकली असून तिची लोकप्रियता प्रचंड असल्याचं पाहायला मिळतं.
-
‘कलर्स’ वाहिनीवरील ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत ‘संयोगिता’ हे पात्र रंगविणारी शर्मिष्ठा थोड्याच काळात घराघरांत पोहोचली आहे.
-
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने अलिकडेच तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली आहे.
-
छोट्या पडद्यावर वावर असणाऱ्या या अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
शर्मिष्ठा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
उत्तम अभिनयासोबतच शर्मिष्ठाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्मिष्ठा राऊत / इन्स्टाग्राम)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”