-
सध्या बलिवूडमध्ये अनेक स्टारकिडस् चर्चेत आहेत. किंग खानची मुलगी सुहाना तसचं शनाया कपूर, सैफचा मुलगा इब्राहिम हे स्टारकिडस् सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. यातच आता आणखी एक नाव सामील झालंय ते म्हणजे अभिनेता आणि डान्सर जावेद जाफरीच्या मुलीचं
-
जावेद जाफरीची मुलगी अलविया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. अलविया तिचे वेगवेगळ्या लूकमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
जाफेद जाफरीला बॉलिवूडमध्ये डान्सर आणि अभिनेता म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. मात्र असं असूनही त्याचं कुटुंब लाईमलाईटपासून दूरचं आहे. अशातच आता त्याची लेक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या अलवियाची चांगलीच चर्चा रंगतेय.
-
जावेदची लेक अलविया २४ वर्षांची आहे. अलवियाच्या मोठ्या भावाचं नाव मिजान तर लहान भावाचं नाव अब्बास आहे.
-
अलविया जाफरीने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलंय. सध्या ती न्यूयॉर्कमधील 'पारसंस स्कूल ऑफ डिझाइन' मधून फॅशन आणि डिझाइनचे धडे घेत आहे.
-
सोशल मीडियावर अलवियाचे अनेक फॉलोअर्स आहेत. तिची फॅशन आणि तिच्या लूक्सला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळते.
-
बॉलिवूडमधील अभिनेत्री जान्हवी कपूर तसचं नव्या नंदा, सारा तेंडुलकर या अलवियाच्या मैत्रिणी आहेत.
-
अनुराग कश्यपची मुलगी आलिया आणि अलाना पांडे यांच्याप्रमाणेच अलविया देखील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. आलिया आणि अलानासोबत ती कोलैब ट्राइब नावाची वेबसाइट चालवते. नव्या पिढीतील नव्या कल्पनांसाठी ही बेवसाइट काम करते.
-
एका मुलाखतीत अलवियाने आम्ही भावंड वडिलांना म्हणजेच जाफेद जाफरीला घाबरतो असं सांगितलं होतं. जावेद जाफरी काहिसा कडक आणि शिस्तबद्ध असल्याने आम्ही घाबरतो असं ती म्हणाली होती.
-
या मुलाखतीत अलवियाला ती बॉलिवूडमध्ये येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र यावर ती म्हणाली, " माहित नाही, कारण मी कधी अभिनय करण्याचा प्रयत्न केला नाही. शिवाय माझ्या वडिलांनाही मी अभिनय क्षेत्रात य़ेऊ नये असं वाटतं." असं ती म्हणाली.
-
तर या मुलाखतीत तिचं मोठा भाऊ मीजानसोबत चांगलं जमत असल्याचं ती म्हणाली.
-
अलवियाला स्वत:चे फोटो काढण्याची आवड आहे. त्यामुळेच ती तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
सोशल मीडियावरील अलवियाचे फोटो पाहून तिला फॅशनची चांगली जाण असल्याचंही लक्षात येतं.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल