-
भारताची ग्लॅमरस बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि दक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशाल हे काल म्हणजेच २२ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नातील आणि लग्ना पूर्वीच्या सोहळ्यामधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चला तर पाहुया हळदी आणि मेहंदीपासून लग्नापर्यंतच्या काही झलक…
-
हैद्राबादमध्ये जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो हे वेडिंग फोटोग्राफरने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (Photo: Karan Soma Photography Instagram)
-
लग्नात ज्वालाने पारंपारिक रेशमी साडी परिधान केली होती. (Photo: Karan Soma Photography Instagram)
-
तर विष्णूने लुंगी आणि शर्ट परिधान केले होते. (Photo: Karan Soma Photography Instagram)
-
ज्वालाने तिच्या दागिन्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Photo: Jwala Gutta Instagram)
-
मेहंदीच्या कार्यक्रमासाठी ज्वालाने नारंगी रंगाची साडी परिधान केली होती. (Photo: Karan Soma Photography Instagram)
-
ज्वालाच्या मेहंदीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या मेहंदीमध्ये बॅडमिंटन दिसत आहे. (Photo: Jwala Gutta Instagram)
-
ज्वालाने तिच्या डायमंड रिंगचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. (Photo: Jwala Gutta Instagram)
-
लग्नात आलेल्या सगळ्या पाहुण्यानी करोनामुळे सगळ्या सुरक्षिततेचे आणि खबरदारीचे पालन केले होते. (Photo: Tamil Cinema Express Instagram)
-
सगळ्या पाहुण्यांची करोना चाचणी ही निगेटिव्ह होती. (Photo: Tamil Cinema Express Instagram)
-
ज्वाला आणि विष्णूच्या लग्नाच्या आधी असणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात २१ एप्रिलपासून झाली होती. (Photo: Jwala Gutta Instagram)
-
ज्वालाच्या हळदीत सगळे आनंदात असल्याचे दिसत आहे. (Photo: Karan Soma Photography Instagram)
-
हळदीच्या कार्यक्रमात तिच्या साडीपासून डेकोरेशनपर्यंत सगळ्या गोष्टी या पिवळ्या रंगाच्या होत्या. (Photo: Karan Soma Photography Instagram
-
ज्वालाला पाहिल्यानंतर ती किती आनंदी आहे हे दिसते. (Photo: Tamil Cinema Express Instagram)
-
या फोटोला पाहिल्यानंतर त्या दोघांनी लग्नाच्या दिवशीपण मस्ती केल्याचे दिसतं आहे. (Photo: Happy Sharing By Dks Instagram)
-
ज्वाला आणि विष्णू बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहेत. (Photo: Karan Soma Photography Instagram)
-
त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीच लपवले नाही. (Photo: Karan Soma Photography Instagram)
-
विष्णू त्याच्या मित्रांसोबत (Photo: Happy Sharing By Dks Instagram)
-
लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमातील ज्वालाचा फोटो. (Photo: Happy Sharing By Dks Instagram)
-
लग्नात आलेल्या पाहुण्यांसोबत ज्वाला आणि विष्णू. (Photo: Tamil Cinema Express Instagram)
-
ज्वालाची आणि विष्णूची जोडी ही सगळ्यांच्या पसंतीस उतरली आहे. (Photo: Tamil Cinema Express Instagram)
-
ज्वालाच्या बॅचलर्स पार्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. (Photo: Jwala Gutta Instagram)
-
ज्वाला तिच्या गर्लगॅंग सोबत. (Photo: Jwala Gutta Instagram)
-
ज्वालाने तिच्या बॅचलोरेट पार्टीला पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (Photo: Jwala Gutta Instagram)
-
ज्वाला आणि तिचा केक. (Photo: Jwala Gutta Instagram)
![Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes, Quotes in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-18-at-11.58.10.jpeg?w=300&h=200&crop=1)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज