-
सुपरस्टार विनोद खन्ना यांच्या निधनाला आज चार वर्षे झाली. एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवलेला हा अभिनेता २७ एप्रिल २०१७ रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी!
-
विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोघेही चांगले मित्र होते. त्यांच्या संघर्षाच्या काळात ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे. अनेक रात्री त्यांनी जुहू बीचवर फिरत काढल्या आहेत. तसंच आपल्या तरुणपणात ते एकत्र डिस्कोमध्येही जायचे.
-
विनोद खन्ना आणि सुनिल दत्त यांची ओळख १९६९मध्ये झाली. सुनिल दत्त यांनी विनोद यांना 'मन का मीत' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. हा चित्रपट सुनिल यांचे भाऊ सोम दत्त यांच्या पदार्पणासाठी तयार करण्यात आला. त्याच्या दोन वर्षांनंतर विनोद यांनी 'मेरा गाव मेरा देश' या चित्रपटातून दमदार पदार्पण केलं.
-
तुम्हाला माहित आहे का, 'कुर्बानी' हा चित्रपट आधी अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर हा चित्रपट विनोद यांच्याकडे आला.
-
१९८०मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्यांनी आध्यात्मिक मार्गाकडे वाटचाल केली आणि ओशो आश्रमाकडे प्रस्थान केलं.
-
एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ते ओशोच्या आश्रमात असताना भांडी घासत, शौचालय साफ करत, कपडेही धुवत.
-
५ वर्षांच्या ब्रेकनंतर विनोद यांनी दमदार कमबॅक करत 'इन्साफ' आणि 'सत्यमेव जयते' हे दोन सुपरहिट चित्रपट दिले. रोहित शेट्टीचा 'दिलवाले' हा त्यांच्या शेवटचा चित्रपट ठरला.

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश