-
छोट्या पडद्यावरील 'तुझसे है राब्ता' अभिनेत्री रीम शेखचे लाखो चाहते आहेत. रीम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
रीमने गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर केल्यामुळे रीम सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
-
या फोटोमध्ये रीमने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
रीम शेख आणि 'तुझसे है राब्ता' या मालिकेची पूर्ण स्टारकास्ट ही गोव्यात आहे. तिथेच या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे
-
रीमचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना आवडला नाही असे दिसतं आहे. रीमने रमजानच्या पवित्र महिन्यात बिकिनी परिधान केल्याने तिला ट्रोल करण्यात आलं आहे. एक नेटकरी म्हणाला, "अल्ला रीम शेखला कधीच माफ करणार नाही."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "धिक्कार तुझ्या चेहऱ्यावर. आपण अल्लाहची मुलं आहोत. तुमच्यामुळे हे सगळं होत आहे. रमजानचा महिना आणि हे काम पाहा. स्वत: ला मुस्लिम बोलू नकोस. काही लाइक्ससाठी इतकं."
-
तिसरा नेटकरी म्हणाला, "कमीत कमीत रमजानच्या पवित्र महिन्यात तर असं करु नकोस."
-
एक नेटकरी म्हणाला, "रमजानच्या महिन्यात अशी पोस्ट करु नको. रमझानच्या महिन्याची तरी काळजी घे."
-
दुसरा नेटकी म्हणाला, "रमजान आहे आठवण आहे ना?"
-
आणखी एक नेटकरी म्हणाला, "थोडी तरी लाज ठेव. रमजानच्या महिन्यात, मुस्लिम असूनही, अल्ला सुद्धा तुझ्यासारख्या लोकांना बनवून खेद करत असेल."
-
रीम शेखने वयाच्या ६ व्या वर्षी 'नीर भरे तेरे नयना देवी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. 'देवों के देव महादेव' मालिकेसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये रीमने काम केले आहे.
-
रीमने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'गुल मकई' या चित्रपटात मलाला युसूफझाईची भूमिका रीमने साकारली होती. (All Photo Credit : Reem Sameer Shaikh Instagram)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल