-
गोविंदा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. १२० हून अधिक चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले आहे.
-
त्याचा अप्रतिम डान्स आणि कॉमेडीच्या जोरावर त्याने लाखो लोकांची मने जिंकली. एकदा गोविंदाने दिग्दर्शक करण जोहरवर नाराजी व्यक्त केली होती.
-
गोविंदाचा 'आ गया हीरो' हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या एक आठवड्यानंतर निर्माता करण जोहरने अभिनेता वरुण धवण आणि अभिनेत्री आलिया भट्टचा 'बद्रिनाथ की दुल्हनिया' प्रदर्शित केला.
-
त्यामुळे गोविंदाच्या चित्रपटावर परिणाम झाला. त्यावेळी गोविंदाने करणवर घराणेशाहीचा आरोप केला होता.
-
'पिंकव्हिला'ने दिलेल्या वृत्तानुसार, "त्याने मला ३० वर्षांत कधीच बोलावलं नाही, मला तर ही सुद्धा शंका आहे की तो त्याच्या मित्रपरिवारात नसलेल्या अभिनेत्यांकडे बघतं ही नसेल आणि त्यांना हॅलोसुद्धा बोलत नसेल,"
-
"तो दयाळू नाही. करणची ही सगळी योजना आहे. माझा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एक आठवड्यानंतर त्याने तो चित्रपट प्रदर्शित केला. मला तो कधीच सरळ किंवा निरागस वाटलाच नाही, असं गोविंदा करणबद्दल म्हणाला."
-
गोविंदाने पहिल्यांदाच करणवर नाराजी व्यक्त केली नाही. तर, 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये गोविंदाला बोलवलं नाही म्हणून तो नाराज होता.
-
हे कळताच करणने दिलगिरी व्यक्त केली. "शोमध्ये गोविंदाला बोलवण्याची चर्चा सुरु होती. पण, त्यावेळी हे शक्य झाले नव्हते,"
-
"आम्ही यावर विचार केला होता, आणि गोविंदाची शोमध्ये हजेरी ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल,"
-
"गोविंदा शोमध्ये नसल्याने, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्याला दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. तो एक उत्तम कलाकार आहे. मला त्याला शोमध्ये पाहायला नक्की आवडेल. मला आशा आहे की तो माझं आमंत्रण स्वीकारेल."
-
तर, करणची दिलगिरी गोविंदाने स्वीकारली नाही. गोविंदा म्हणाला, “त्याने जर गोविंदाला फोन केला तर त्याच्यासाठी ही राष्ट्रीय सन्मानाची गोष्ट असेल असं तो म्हणाला असेल, परंतु तो माझ्या चित्रपटाच्या एका आठवड्यानंतर वरुणचा चित्रपट प्रदर्शित करतो,"
-
"तो दाखवतो की तो खूप नम्र आणि सरळ आहे, परंतु तो मला डेव्हिड पेक्षा जास्त हेवा करणारा वाटतो." (All Photo Credit : Govinda instagram and karan johar instagram)

अखेर ‘तो’ निर्णय रद्द… शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापनाने सोडला सुटकेचा निश्वास