-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी ही आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यांची जोडी ही सगळ्यात बेस्ट जोडी होती, असं अनेक लोक अजूनही बोलतात.
-
ते विभक्त झाल्याची बातमी चाहत्यांना कळताच त्यांना धक्काच बसला होता. ते आज त्यांच्या आयुष्यात पुढे जरी गेले असले तरी त्यांच्या चाहत्यांना त्या दोघांविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते.
-
२००२ मध्ये सलमान आणि ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये होते. संजय भन्साळी दिग्दर्शित 'दिल दिल चुके सनम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान ते रिलेशनशिपमध्ये आले.
-
परंतु त्यांनी दोन वर्षांतच ब्रेकअप केलं. त्यावेळी त्यांचे रिलेशनशिप हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली बातमी ठरली होती.
-
असे म्हटले जाते की सलमान ऐश्वर्याच्या बाबतीत 'पझेसिव्ह' होता. सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असताना मानसिक आणि भावनिक त्रास होत होता असं ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
त्यानंतर ऐश्वर्याने त्याच्याबरोबर कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
तर, ऐश्वर्याच्या आई-वडिलांना सलमान आणि तिचे नाते मान्य नव्हते. सलमानने त्यांच्याशी देखील गैरवर्तन केल्याचे म्हटले जाते.
-
एक दिवस सलमान सकाळी ३ वाजता ऐश्वर्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर गोंधळ घालतं होता. कारण सलमानने केलेल्या गैरवर्तणामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला सलमानला भेटण्यापासून रोखले होते. तर ऐश्वर्याचे वडील कृष्णराज यांनी सलमान विरोधात पोलिस तक्रार देखील केली होती.
-
दरम्यान, एका मुलाखतीत सलमानला या आरोपाबद्दल विचारले होते. "मीच त्यांच्याशी गैरवर्तन केले होते," असे सलमान म्हणाला होता.
-
तर, २००२ मध्ये 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला, "तिचे आईवडील खूप चांगले आहेत. ते माझ्या कुटुंबाप्रमाणे रूढी परंपरांचे पालन करणारे आहेत,"
-
"त्यांना माझ्या भूतकाळातील अनेक गोष्टी माहित आहेत. त्यांच्या मुलीच्या आयुष्यात मी असलेलं त्यांना आवडतं नाही. हा माझा दोष आहे, त्यांचा नाही. मला हे आधी समजायला पाहिजे होते. मी त्यांच्याशी गैरवर्तण केलं तरीसुद्धा त्यांनी मला ऐश्वर्याशी भेटण्यास कधीही रोखले नाही. माझ्या वडिलांबरोबर कुणीही गैरवर्तन केले तर मी त्यांचे कौतुक करणार नाही त्याचप्रमाणे ऐश्वर्याला माझी वर्तणूक आवडली नव्हती. ऐश्वर्याच्या वडिलांनी माझ्याविरोधात तक्रार करणे पूर्णपणे योग्य आहे. माझ्या मनात त्यांना विषयी राग. "
-
जेव्हा सलमानला ऐश्वर्यासोबत झालेल्या वादांबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, "जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये भांडत नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही. परक्या लोकांशी मी का भांडणार?"

Indus Waters Treaty suspension: “पाकिस्तानला हे परवडणारं नाही”; पाकिस्तानातील तज्ज्ञ सांगताहेत, असे का?