-
बॉलिवूड अभिनेत्री या सतत ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. पण कधीकधी अभिनेत्री आणखी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करताना दिसतात. चला जाणून घेऊया कोणत्या कोणत्या अभिनेत्रींनी सर्जरी केली आहे…
-
दीपिका पदूकोण- बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोणने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी प्लास्टिक सर्जरी केली होती. तर, प्लास्टिक सर्जरीनंतर दीपिका अधिक सुंदर दिसू लागली.
-
प्रियांका चोप्रा – बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राची चर्चा फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये देखील होते. प्रियांकाने तिच्या लूक्समध्ये बदल केले आहेत. प्रियांकाने एकदा नाही तर बऱ्याच वेळा प्लास्टिक सर्जरी केली आहे. प्रियांकाने तिचं नाक, ओठ आणि चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली. एवढंच नाही तर तिने ब्रेस्ट इम्प्लांट देखील केलं होतं.
-
कंगना रणौत – बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगनाने देखील प्रियांका सारखं ब्रेस्ट इन्प्लांट केलं आहे.
-
कतरिना कैफ – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कतरिना कैफला लाँच केले. पण कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ओठांची प्लास्टिक सर्जरी केली.
-
जॅकलिन फर्नांडिस – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील ओठांची सर्जरी केली आहे.
-
ऐश्वर्या राय बच्चन – विश्व सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अगोदरपासून सुंदर आहे. मात्र, ऐश्वर्याने देखील प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने तिच्या गालांचा आकार बदलला होता.
-
अनुष्का शर्मा: २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात अनुष्का ही बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत काम करत होती. त्यानंतर एका चित्रपटासाठी तिने ओठांची सर्जरी केली होती. तर अनुष्काचे ओठ सर्जरीनंतर सुंदर दिसत नाही म्हणतं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केले होते.
-
करीना कपूर खान – बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानने देखील तिच्या ओठांची आणि चिक बोन्सची सर्जरी केली होती.
-
करिश्मा कपूर – बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही तिच्या लूक्ससाठी ओळखली जाते. करिश्माने तिच्या नाकाची आणि तिच्या ओठांची सर्जरी केली आहे.
-
माधुरी दीक्षित – बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिचं वय लपवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती.
-
शिल्पा शेट्टी – बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पाने तिच्या नाकाची सर्जरी केली होती. 'ही काही लपवण्यासारखी मोठी गोष्ट नाही', असं म्हणतं शिल्पाने सर्जरी केल्याने मान्य केले होते.
-
श्रृती हसन – अभिनेता कमल हसन यांची लेक श्रृती हसनने देखीन सर्जरी केली आहे. श्रृतीने नाकाची सर्जरी केल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर तिने ओठांची सर्जरी केल्याचे म्हटले जातं होते.
-
वाणी कपूर – 'बेफिक्रे' या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री वाणी कपूरचे लाखो चाहते आहेत. या आधी वाणीने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटात भूमिका साकारली होती. वाणीने तिच्या ओठांची आणि चेहऱ्याची सर्जरी केली आहे. मात्र, वाणीने सर्जरी केल्याचे कधी मान्य केले नाही.
-
सुष्मिता सेन – विश्वसुंदरी सुष्मिता सेनने मीस इंडिया झाल्यानंतर प्लास्टिक सर्जरी केली होती.
-
श्रीदेवी – बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी. श्रीदेवी यांनी देखील प्लास्टिक सर्जरी केली होती. श्रीदेवी यांनी आधी नाकाची सर्जरी केली आणि नंतर ब्रेस्ट इम्प्लांट केलं.
-
राखी सावंत – बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतने देखील प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र, प्लास्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा आणखी खराब दिसू लागला होता. बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राखी सगळ्यात पुढे आहे.
-
ईशा देओल – ईशा देओल – बॉलिवूड अभिनेत्री हेमामालिनी यांची लेक ईशा देओलने देखील ओठांची सर्जरी केली आहे. मात्र, सर्जरीनंतर तिच्या लूक्समध्ये जास्त फरक दिसला नाही.
-
नरगिस फाखरी- अभिनेत्री नरगिस फाखरीने ओठांची सर्जरी केली आहे.
-
बिपाशा बासु – बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासुने फक्त प्लास्टिक सर्जरी केली नाही तर, स्किन लायट्निंगची ट्रीटमेंट सुद्धा घेतली आहे.
-
गौहर खान – अभिनेत्री गौहर खानने 'रॉकेट सिंग सेल्समॅन ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर गौहरने ओठांची प्लास्टिक सर्जरी केली. मात्र, सर्जरीनंतर गौहरला तिचे ओठ सुंदर दिसत नव्हते म्हणून बराच काळ ती मीडियापासून लांब राहिली होती.
-
मल्लिका शेरावत – बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतने देखील तिच्या ओठांची सर्जरी केली होती. त्यानंतर मल्लिकाने देखील ब्रेस्ट इम्प्लांट केलं होतं.
-
प्रिती झिंटा – बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून प्रिती झिंटा ओळखली जाते. प्रितीने देखील तिच्या नाकाची आणि ओठांची प्लास्टिक सर्जरी केली आहे.
-
जान्हवी कपूर – बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवीने आई श्रीदेवी प्रमाणेच ओठांची सर्जरी केली आहे.
-
आयशा टाकिया – बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाने ओठांची सर्जरी केली होती. मात्र, ओठांच्या सर्जरीनंतर तिला अनेकांनी ट्रोल केले.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख