-
लॉकडाऊनमुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले असून मालिकांच्या शूटिंगला परवानगी नाकारण्यात आलीय. झी मराठीवरील अनेक मालिकाचं शूटिंग बेळगाव, दोवा, सिल्वासा इथं सुरुय.
-
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मायभूमीपासून दूर राहूनही मराठी कलाकारांनी आणि मालिकेच्या टीमने महाराष्ट्र दिन साजरा केला. 'माझा होशील ना' आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकांच्या सेटवर अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा केला.
-
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करून आजच्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. १ मे हा कामगार दिन देखील असल्याने सेटवरील तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.
-
सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ पारंपारिक पेहरावात होते. महाराष्ट्राची ओळख असलेले मानाचे फेटे सगळ्यांनी बांधले.
-
महाराष्ट्रा बाहेर शूटिंग सुरु असल्याने सगळेच घरचं जेवण मिस करत आहेत. त्यामुळेच खास मराठमोळ्या जेवणाची मेजवानी होती.
-
सध्याच्या करोनाच्या काळात आपल्या लोकांच्या मदतीसाठी म्हणून 'माझा होशील ना', ओशन फिल्म आणि सगळे कलाकार तसचं तंत्रज्ञ यांनी एकत्र येत निधी उभा केला असून तो महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला सुपूर्त करण्यात येणार आहे.

Video: “त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजू…”, आरोपी दत्ता गाडेच्या भावाने मांडली धक्कादायक भूमिका