-
सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करणं अखेर अभिनेत्री कंगना रणौतला महागात पडलं आहे. कंगणा रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. जगातील सर्वाधिक लोकप्रिय माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइटपैकी एक असणाऱ्या ट्विटरने कंगनावर कारवाई करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच कंगनाचं अकाऊंट कायमचं बंद करण्यात येत असल्याचंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे. कंगनाचं अकाऊंट बंद झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाहायला मिळतोय. हे भन्नट मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
एका युजरने कंगनाच्या 'तन्नु वेडस् मन्नू' सिनेमातील एक फोट शेअर केलाय. त्यावर 'अभी हमे और भी जलील होना है' असं लिहिलेलं आहे.
-
एका मीमीमध्ये अभिनेते अमरीश पुरी देवाचे आभार मानताना दिसत आहेत. 'आखीर वो दिन आही गया' असं यात म्हंटलं आहे.
-
या मीममध्ये कंगनाचं अकाऊंट बंद झाल्यावर नेटकऱ्यांना कसा आनंद झाला हे दाखवण्यात आलंय.
-
तर कंगनावर ट्विटरने कारवाई केल्यानंतर सध्या ती किती चिडली आहे हे या मीममधून दाखवण्यात आलंय.
-
यातील अनेक मीम्स असे आहेत ज्यात कंगनाच्या शत्रूंना आनंद झाल्याचं दाखवण्यात आलंय. खास करून अभिनेता ह्रतिक रोशनचे अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. ममता बॅनर्जी आणि ह्रतिक रोशन यांच्या भेटीचे फोटो तुफान व्हायरल होत असून आता ह्रतिकला शांती मिळाली असेल अशा आशयाचे अनेक मीम्स व्हायर होत आहेत.
-
. कंगना सोशल मीडियावरून अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्तेत आली आहे. यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलंय.
-
तसचं सोशल मीडियावरून ट्रोल करणाऱ्यांना कंगना सडेतोड उत्तर देण्यात मागे हटायची नाही. त्यामुळे कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. एका मीममध्ये आता मिठाई वाटा असं म्हंटलंय.
-
तर कंगनाच्या 'क्विन' सिनेमातील गाजलेल्या एका सीनमधील डायलॉग मीममधून शेअर करत नेटकऱ्यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. "मेरा तो इतना लाइफ खराब हो गया' म्हणत रडणारी कंगना यात दिसतेय.
-
परेश रावलं यांचा एका सिनेमातील विनोदी फोटो शेअर करत या मीममध्ये आता बरं वाटलं असं दाखवण्यात आलंय.
-
या मीममध्ये एका युजरने 'उत्सव की तयारी करो' म्हंटलंय.
-
तर एका युजरने 'गँगस्टर' सिनेमातील हा फोट शेअर करत 'सॉरी डार्लिग' अंस लिहिलं आहे.
-
ह्रतिकसोबतच कंगनाने अभिनेता दिलजीत दोसांज याच्याशी देखील पंगा घेतला होता. त्यामुळे एका युजरने दिलजीतचा हा फोटो शेअर केलाय.
-
तर एका मीममध्ये एका मानवी मेंदूची रचना असेलेल दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. सिनेमाच्या बाबतीत कंगनाचा मेंदू भरलेला आहे असं दाखवण्यात आलंय. तर दुसऱ्या इमेजमध्ये ट्विटरवर कंगनाचा मेंदू रिकामा असल्याचं दाखवण्यात आलंय.
-
या मीममध्ये 'तुम क्या लेके आये थे और क्या लेके जाओगे' असं म्हंटलं आहे.
-
तर या मीममध्ये दोन वेगवेगळी सरोवरं दिसत आहेत. एकात कंगना ट्विटरवर असताना असं म्हणलंय. यात सरोवरात बराच कचरा दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत एक सुंदर, स्वच्छ सरोवर दिसतंय. कंगनाचं अकाऊंट बंद केल्यानंतर असं यावर म्हण्यात आलंय. यानंतर सध्या सोशल मीडियावर #कंगना_तुम_कहाँ_हो हा ट्रेंड पाहायला मिळतोय.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल