-
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु झाली आहे.
-
अभिवरचे खुनाचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर आता त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार आहे.
-
अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.
-
या खास भागात नाचगाण्यांचा धमाल कार्यक्रमही रंगणार आहे. देखमुख कुटुंबातलं हे हसतं खेळतं वातावरण आणखी किती काळ टिकणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. कारण संजनारुपी वादळ या कुटुंबावर दबा धरुन बसलेलं आहेच.
-
अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा निर्विघ्न पाह पडणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

Video: “त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजू…”, आरोपी दत्ता गाडेच्या भावाने मांडली धक्कादायक भूमिका