-
'द कपिल शर्मा' या शोमधून घराघरात पोहचलेली कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि विनोदवीर डॉ.संकते भोसले लग्न बंधनात अडकले आहेत. 27 एप्रिलला जालंधरमध्ये त्यांचा लग्न सोहळा पार पडला. सुगंधाने तिच्या लग्नाच्या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
लग्नानंतर आता सुगंधाचा सासरी गृह प्रवेश झाला असून सुंगधाने गृह प्रवेशाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मराठमोळ्या डॉ. संकेत भोसलेशी लग्न केल्यानंतर आता सुंगधाचा देखील मराठमोळा अंदाज समोर आलाय. लग्नानंतरच्या पूजेसाठी सुगंधाने खास नऊवारी साडी परिधान केली होती.
-
सुगंधाने पूजेचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी परिधान केलीय.
-
नाकात नश, गळ्यात ठुशी, केसात गजरा आणि कपाळावर चंद्रकोर असा सुगंधाचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
-
सुगंधाने तिचा गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर केलाय.
-
तर संकेतने देखील शेरवानी परिधान केलीय. दोघांची जोडी यात चांगलीच उठून दिसतेय.
-
सुंगधाने पूजेच्या दिवशी सासरच्या मंडळींसाठी खास पंजीरी बनवली होती.
-
गेल्या चार वर्षांपासून सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले रिलिशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
सुगंधाच्या साखरपुड्यापासून तिच्या लग्नाच्या विधीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
तर पूजेसाठी सुंगधाने केलेल्या मराठमोळ्या लूकला देखील चाहत्यांनी पसंती दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुगंधाने "एवढ्या प्रेमासाठी धन्यवाद" असं म्हणत शुभेच्छा देणाऱ्या चाहच्यांचे आभार मानले आहेत. (All Photos: sugandhamishra23 instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख