-
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही बॉलिवूडची गॉसिप गर्ल म्हणून ओळखली जाते. करीना बिनधास्तपणे बॉलिवूड मधील कलाकारांबद्दल तिला काय वाटते हे सांगत असते. बऱ्याचवेळा तिने केलेल्या वक्तव्यांमुळे करीना ट्रोल झाली आहे.
-
एकदा तर करीना एका मुलाखतीत विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला म्हातारी बोलली होती.
-
ही मुलाखत करीनाच्या 'हिरोइन' या चित्रपटा दरम्यानची होती. या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्या रायला विचारण्यात आलं होतं. मात्र, गर्भवती असल्याने तिने या चित्रपटाला नकार दिला होता.
-
त्याचप्रमाणे, बेबोने एकदा अभिनेत्री विद्या बालनवर देखील वक्तव्य केलं होतं. विद्याच्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातील भूमिकेवर करीनाने तिचं मत मांडल होतं.
-
विद्याने तिच्या डर्टी पिक्चरसाठी वजन वाढवले होते. हा चित्रपट तिच्या करिअरमध्ये उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याच भूमिकेवर करीनाने वक्तव्य केलं आहे. "जाड असल्यावर सुंदर दिसत नाही! जो कोणी असं बोलतो तो वेडा आहे. आकर्षक दिसणे म्हणजे सुंदर आहे, पण जाड नाही."
-
"कोणतीही स्त्री जी बोलते की मला बारीक व्हायचं नाही, ती खोटं बोलते. कारण प्रत्येक मुलीचं हे स्वप्न आहे," असं करीना म्हणाली होती.
-
करीना तिथेच थांबली नाही तर, "काही अभिनेत्रींमध्ये आता हा ट्रेंड असू शकतो. परंतु मला नक्कीच जाड दिसायला आवडणार नाही!"
-
एकदा करीना दिग्दर्शक करणच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये उपस्थित होती. त्यावेळी देखील तिने विद्यावर तिच्या भूमिकेवरून कमेंट केली होती.
-
करणने करीनाला प्रश्न विचारला की, "जर तू एक दिवस सकाळी विद्याच्या जागेवर उठलीस तर तुला कसं वाटेल?"
-
त्यावर करीना म्हणाली, "मला डर्टी वाटेल." करीनाने विद्याच्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटाच्या संदर्भात ही कमेंट केली होती.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल