-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'रात्रीस खेळ चाले.'
-
या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले
-
पण शेवंता आणि अण्णा नाईक यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती.
-
शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला.
-
अण्णा नाईक ही भूमिका अभिनेते माधव अभ्यंकर यांनी साकारली होती तर शेवंता ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारली होती.
-
मालिकेत शेवंतावर जीव ओवाळून टाकणाऱ्या अण्णा नाईक म्हणजेच माधव यांची खऱ्याखुऱ्या आयुष्यतील पत्नीही अतिशय सुंदर आहे.
-
माधव यांच्या पत्नीचे नाव रेखा आहे.
-
माधव पत्नीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
-
बऱ्याच वेळा रेखा या मालिकेच्या सेटवर देखील जाताना दिसतात.
-
लॉकडाउनच्या काळात माधव पत्नीसोबत वेळ घालवताना दिसले होते.
-
माधव आणि रेखा हे सतत बाहेर फिरतानाचे फोटो शेअर करताना दिसतात.
-
त्या दोघांच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.
-
माधव आणि रेखा यांचा हा फोटो चर्चेत होता.
-
माधव यांची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे.
-
झी मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या दोन्ही भागांनी, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते.
-
आता 'रात्रीस खेळ चाले ३' प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…