-
वर्षाच्या सुरुवातील अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिकुकलीचं आगमन झालं. विरुष्काने त्यांच्या मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे. गरोदरपणातही अनुष्का फिटनेससाठी व्यायाम करताना दिसायची. बाळ झाल्यानंतर अनुष्का जास्तीत जास्त वेळ मुलीसोबत घालवताना दिसतेय. (photo-instagram@anushkasharma)
-
तर बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान देखील या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. 21 फेब्रुवारीला करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मात्र सैफिनाने यंदा दुसऱ्या बाळाला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अद्याप त्यांच्या दुसऱ्या बाळाचा फोटो समोर आलेला नाही. (photo-instagram@kareenakapoorkhan)
-
अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि तिचा पती रोहित रेड्डी यांनी सोशल मीडियावरून बाळाच्या आगमनाची बातमी दिली होती. 9 फेब्रुवारीला अनिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिच्या मुलाचं नाव आरवं असं आहे. आई झाल्यानंतर बाळासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अनिता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. (photo-instagram@anitahassanandani)
-
तर टेलिव्हिजन अभिनेत्री अदिती मलिकने नुकताच म्हणजेच 29 एप्रिलला मुलाला जन्म दिलाय़.आई झाल्यानंतरचा फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलाय.(photo-instagram@additemalik)
-
गायिका हर्षदीप कौर हिने 2 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला. हुन्नर असं त्यांनी मुलाचं नाव ठेवलं आहे. (photo-instagram@harshdeepkaurmusic)
-
3 फेब्रुवारीला गायिका जानकी पारेखने मुलाला जन्म दिला. तिने मुलाचं नाव सुफी ठेवलंय. नुकतेच जानकीने मुलासोबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती मुलगा सुफीसमोर गाताना दिसतेय..(photo-instagram@jank_ee)

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…