-
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा याचा आज ९ मे रोजी वाढदिवस आहे. विजय आज त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
विजय तेलगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विजयने आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, विजयला खरी प्रसिद्धी ही २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातून मिळाली.
-
विजयच्या 'लाइगर' या बॉलिवूड चित्रपटाची प्रतिक्षा त्याचे चाहते करत आहेत. आज कोट्यवधी संपत्तीचा मालक असलेल्या विजयकडे कधीकाळी घरभाड्यासाठी देखील पैसे नसायचे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
-
विजयचा जन्म तेलगू घराण्यात झाला होता. त्याचे वडील देवरकोंडा गोवर्धन रावसुद्धा टीव्ही स्टार होते.
-
विजय त्याच्या अभिनयासोबत आणखी एका गोष्टीमुळे लोकप्रिय आहे. ते म्हणजे त्याच टोपणं नावं.
-
विजयचे टोपणं नाव हे 'राउडी' आहे. लहानपणापासून फटकळं असल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला 'राउडी' नावाने बोलायला सुरुवात केली होती.
-
विजयने २०११मध्ये 'नुव्विला' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला.
-
त्यानंतर विजयने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २०१६ मध्ये विजयने रोमँटिक ड्रामा 'पेली चोपुलु' या चित्रपटात काम केले. या चित्रपटाला तेलुगु चित्रपटांमध्ये बेस्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
-
मात्र, विजयला खरी ओळख ही २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातून विजयने फक्त दक्षिण भारतातील नाही तर संपूर्ण भारतातील प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
एका मुलाखतीत विजयने करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षांबद्दल सांगितलं. अनेक वेळा असे झाले की त्याच्याकडे घरभाड्यासाठी पैसे देखील नसायचे. मात्र, त्याने हार मानली नाही. त्याने मेहनत केली आणि आज तो एक लोकप्रिय अभिनेता आहे.
-
आज एक उत्तम अभिनेत्यासोबतच विजय एक निर्माता देखील आहे. त्याच्या प्रोडक्शन कंपनीचे नाव 'हिल इंटरटेनमेंट' आहे.
-
त्याच्या या प्रोडक्शन कंपनीने 'मीकू माथरेम चेपथा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
एवढंच नाही तर विजयचं स्वत:च एक कपड्यांचं ब्रॅंड देखील आहे. 'राउडी वियर' असे त्या ब्रॅंडचे नाव आहे.
-
विजय त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत एका आलिशान घरात राहतो. माहिती नुसार, जुबली हिलमध्ये असलेल्या त्याच्या या घराची किंमत १५ कोटींच्या आसपास आहे.
-
विजयचे नाव हे २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या फॉरबेस अंडर ३० च्या यादीत नाव होतं. ३० वर्षांच्या आत अपार संपत्ती कमवणाऱ्या लोकांच्या यादीत त्याचे नाव होते.
-
या आधी विजयवर एकवेळ अशी आली होती. जेव्हा अकाऊंटमध्ये पैसे नसल्याने विजयचे बॅंक अकाऊंट हे सील करण्यात आले होते.
-
तर विजयने 'डियर कामरेड', 'मेहनती', 'अर्जुन रेड्डी' आणि 'वर्ल्ड फेमस लव्हर' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. (All Photo Credit : Vijay Devarkonda Instagram)

Video: “त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजू…”, आरोपी दत्ता गाडेच्या भावाने मांडली धक्कादायक भूमिका