-
मराठीतल्या दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.
-
मराठी सिनेसृष्टीत मागील अनेक वर्षांपासून अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमधून प्रक्षकांचे मनोरंजन करणारे केदार शिंदे.
-
केदार शिंदे यांचा लग्नाला ९ मे रोजी पंचवीस वर्ष पुर्ण झाली.
-
केदार शिंदे यांनी रविवारी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. आपल्या पत्नीसोबतच त्यांनी पुन्हा लग्न केलं.
-
घरीच हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला.
-
या लग्नसोहळ्याला काही कलाकारसुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते.
-
पंचवीस वर्षापुर्वी त्यांच कोर्टमॅरेज झाले होत त्यामुळे लग्नात कुठलीच हौसमौज करता आली नव्हती.
-
त्यावेळी कोर्ट मॅरेजमुळे मोजकेच लोक उपस्थीत होते आणि लॉकडाऊनमुळेही मोजकेच लोक उपस्थीत होते.
-
लग्न सोहळा अगदी साग्रसंगीत सुरु झाला. जे केदार आणि बेलाच्या पहिल्या लग्नात दुरवर कुठेच नव्हते त्यांनी या लग्नातल यजमानपद अत्यंत उत्साहात उचललं होत.
-
केदार कडून प्रशांत गवाणकर कुटूंबीय होते तर बेला कडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते.
-
केदार शिंदे आणि बेला यांची प्रेम कहाणी तशी जगजाहीर आहे. पण तब्बल पंचवीस वर्षे उलटल्यानंतरही या जोडीमध्ये प्रेमाचा गंध अजूनही पहिल्या प्रेमासारखाच असल्याचे दिसते.
-
साधे राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे केदार शिंदे प्रेक्षकांचे लाडके आहेत.
-
केदार शिंदे आणि बेला यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
केदार शिंदेच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केदार शिंदे / फेसबुक)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…