-
बाहुबलीची देवसेना म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच अनुष्का शेट्टी. अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या लग्नाची चर्चा ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. अनुष्काचे लाखो चाहते आहेत.
-
अनुष्काच्या लग्नाची चर्चा ही तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर नेहमीच केली जाते.
-
'बाहुबली' चित्रपटातील देवसेना आणि बाहुबली यांचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले पाहिजे, अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांनी बऱ्याच वेळा व्यक्त केली आहे.
-
या दोघांमध्ये असलेले प्रेम हे सगळ्यांना दिसते, असे अनेक चाहते बोलतात.
-
मात्र, या दोघांनी बऱ्याचवेळा ते चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे.
-
एका मुलाखतीत अनुष्का शेट्टीने तिच्या आणि प्रभासच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ आणि प्रभासचं खूप वेगळं नातं आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत."
-
"मी प्रभासला गेल्या १५ वर्षांपासून ओळखते. तर तो माझ्या 3 AM मित्रांपैकी एक आहे," म्हणजे अनुष्काला रात्री कितीही उशिरा काहीही अडचण असली तरी ती प्रभासला फोन करून मदत मागु शकते.
-
"आमच्या दोघांचे नाव यासाठी एकत्र जोडले जाते, कारण आम्ही दोघांनी अजून लग्न केले नाही. आणि आमची जोडी चित्रपटात खूप सुंदर दिसते," असे अनुष्का म्हणाली.
-
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का दुबईत असलेल्या एका बिझनेसमॅनशी लग्न करणार आहे. हा बिझनेसमॅन वयाने तिच्याहून लहान आहे.
-
अनुष्काचे आई-वडील गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या लग्नाचा विचार करत आहेत. मात्र, अनुष्काने आता लग्नासाठी होकार दिला आहे.
-
त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी एक चांगला वर शोधण्यास सुरुवात केली असता. त्यांना मुलगा मिळाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
अनुष्काचे लग्न हे अरेंज मॅरेज असणार आहे.
-
लग्नानंतर अनुष्का दुबईला सेटल होणार आहे.
-
मात्र याबाबत अनुष्काच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही
-
हे पहिल्यांदा झालेलं नाही तर, या आधी अनुष्का भारतीय क्रिकट टीमच्या एका क्रिकेटरशी लग्न करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरु होती.
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल