-
अभिनेत्री रेखा या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. रेखा यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत असायच्या.
-
अमिताभ आणि रेखा यांची लव्हस्टोरी तर अजूनही लोकांच्या लक्षात आहे. दरम्यान, आज आपण रेखा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या रिलेशनशिपबद्दल जाणून घेणार आहोत.
-
इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याआधी ते एक उत्तम क्रिकेटर म्हणून ओळखले जात होते. मैदानातील त्यांचा खेळ आणि त्यांच्या लूक्समुळे ते सतत चर्चेत असायचे. यामुळे त्यांचे नाव हे अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. त्यापैकी एक म्हणजे रेखा जी.
-
एका वर्तमान पत्रातील रेखा आणि इम्रान यांच्या लग्ना विषयीचा एक जूना लेख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा लेख पाकिस्तानच्या पत्रकार सनम माहेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हे 'द स्टार'चे वृत्त आहे. बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू इम्रान खान लग्न करणार, असे या लेखात म्हटले आहे. एवढंच नाही तर रेखा यांच्या आईने त्यांच्या लग्नासाठी परवानगी दिल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
-
या लेखात म्हटले आहे की, "रेखा आणि इम्रान खान लग्न करणार आहेत. तर इम्रान खान यांनी त्यावर्षी उन्हाळ्यात संपूर्ण एप्रिल महिना हा मुंबईत घालवला होता."
-
"त्यावेळी इम्रान आणि रेखा यांना अनेक वेळा समुद्र किनाऱ्यावर, प्रेम शिवार गोदरेज यांच्या निवासस्थानी आणि नाईट क्लबमध्ये बघितले होते."
-
या नात्यावर रेखा यांच्या आईची काय प्रतिक्रिया होती हे देखील त्यात सांगण्यात आले आहे. त्या लेखात म्हटले आहे की, "रेखा यांच्या आईने इम्रान सोबत असलेल्या रेखा यांच्या रिलेशनशिपला मान्यता दिली होती. एवढंच नाही तर, त्यांची इच्छा होती की रेखा आणि इम्रान यांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहिरपणे सगळ्यांना सांगावे."
-
"यासाठी रेखा यांच्या आई दिल्लीला गेल्या होत्या. तिथे त्यांनी नाजोमी या ज्योतिषींना विचारले. यावर ज्योतिषींनी कोणता सल्ला दिला ते माहित नाही परंतु रेखा यांच्या आईला खात्री होती की इम्रान आणि रेखा यांची चांगली जोडी जमेल."
-
"रेखा आणि इम्रान यांच्यात असलेले नाते आणि त्यांच्यात असलेली जवळीकता ज्या लोकांनी पाहिली. त्यांचे म्हणने होते रेखा आणि इम्रान यांना एकत्र पाहिल्यानंतर ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात असे दिसायचे."
-
या लेखाच्या शेवटी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मत देखील लिहिले आहे. "मला रेखा यांच्यासोबत वेळ व्यथित करायला प्रचंड आवडायचे."
-
"मात्र, ते थोड्यावेळासाठीच चांगलं आहे. त्यानंतर मी पुढे निघालो."
-
"मी एखाद्या चित्रपट अभिनेत्रीशी लग्न करण्याचा विचारही करु शकत नाही," असे इम्रान म्हणाले होते.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख