-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता प्रियांका एका जून्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.
-
प्रियांकाचा नवरा अमेरिकेचा लोकप्रिय गायक याने २९ फेब्रुवारी २०२० रोजी एक फोटो शेअर केला होता. हाच फोटो पुन्हा एकदा प्रियांकाच्या इन्स्टाग्रामवरील प्रियंकाचे क्लोसेट या फॅन अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
-
या फोटोत प्रियांकाने लाल रंगाचं एक बोहेमियन जॅकेट परिधान केले आहे. तर या जॅकेटवर मॉं कालीचा फोटो पाहायला मिळतं आहे. या फोटोवरून प्रियांकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.
-
एक नेटकरी म्हणाला, "देव फॅशनसाठी नाही."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "देवीचा अपमान करू नका"
-
तिसरा म्हणाला, "अशी भयंकर कृत्य..देवा कृपया माफ करा."
-
पुढे एक नेटकरी म्हणाला, "आपल्या शरीरावर देवाचे वस्त्र परिधान करु नका कारण देव पवित्र, आणि तुझं कुटुंब आहे काही तरी विचार कर."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "लाजिरवाणी गोष्ट, प्रियांकाच्या सगळ्या पेज्सला अनफॉलो करा. तू असे कपडे कसे परिधान करू शकते…"
-
तिसरा नेटकरी म्हणाला, "धर्माचा अपमान करु नका."
-
तर पुढे आणखी एक नेटकरी म्हणाला, "भयानक." अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल केले आहे.
पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल