-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री सायली संजीव.
-
काही दिवसांपूर्वी सायलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.
-
या फोटोमध्ये तिने एक वनपीस परिधान केला असून ती अतिशय सुंदर दिसत होती.
-
तिच्या या फोटोवर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने कमेंट करत लक्ष वेधून घेतले होते.
-
ऋतुराजने "Woahh" अशी कमेंट केली होती.
-
त्यानंतर ऋतुराजचे नाव सायलीशी जोडले जात होते.
-
आता ऋतुराजने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
-
त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे.
-
त्याने या पोस्टमध्ये स्वत:चा फोटो शेअर केला आहे.
-
'माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो आणि क्लिन बोल्ड सुद्धा. कुणाचं काय तर कुणाचं काय' असे त्याने म्हटले आहे.
-
या फोटोच्या खाली त्याने, 'ज्यांना समजायचंय त्यांना समजलं. कोणीतरी खरं म्हटलय मिठ, मसाला आणि मिरची टाकली की चव येते' असे म्हटले आहे.

Mothers Day 2025: “घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही…” आईला मातृदिनाच्या द्या हटके शुभेच्छा; एकापेक्षा एक सुंदर मेसेज अन् फ्री डाउनलोड करा HD फोटो