-
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांची जोडी ही बॉलिवूड मधील हटके जोडी म्हणून ओळखली आहे.
-
त्यांची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. शाहिद आणि मीराने अभिनेत्री नेहा धुपियाच्या 'व्होग बीएफएफ' या चॅट शो मध्ये हजेरी लावली होती.
-
यावेळी नेहाने त्यांच्यासोबत एक खेळ खेळला होता. या खेळात जर कोणी खोटं बोललं तर त्यांना त्यांचे एक-एक कपडे काढावे लागणार होते.
-
या मुलाखतीत नेहाने मीराला शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंड विषयी प्रश्न विचारला.
-
तुला शाहिदची कोणती एक्स गर्लफ्रेंड आवडत नाही? असा प्रश्न नेहाने मीराला विचारला. तर मीराने दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मने जिंकली आहेत.
-
हा प्रश्न मीराला विचारल्यानंतर शाहिद अस्वस्थ झाला. मात्र, मीरा म्हणाली, "शाहिदच्या दोन्ही एक्स आजच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळेच त्या दोघी मला आवडतात."
-
मीराचे उत्तर ऐकून शाहिद आनंदित आणि आश्चर्यचकित झाला. तर नेहाने देखील मीराचे कौतुक केले.
-
मीराच्या उत्तरावरून समजते की शाहिदच्या एक्स कोण आहेत. याचा तिच्यावर काही फरक पडतं नाही. कारण तिला माहित आहे की शाहिदचं वर्तमान आणि त्याचं भविष्य ती आहे.
-
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले.
-
त्यानंतर २ वर्षांनी २६ ऑगस्ट २०१६ ला मीशाचा जन्म झाला. तर, ५ सप्टेंबर २०१८ रोजी झैनचा जन्म झाला. (All Photo Credit : (Shahid Kapoor Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख