-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अभिनेत्री, लेखिका अमृता सुभाषचा आज वाढदिवस.
-
‘श्वास’, ‘देवराई’, ‘नितळ’, ‘अस्तु’ आणि ‘किल्ला’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांतून भूमिका करत प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्याही पसंतीला उतरलेली अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष.
-
अमृताने चित्रपट, रंगमंच आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये आपली छाप उमटवली आहे.
-
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या नाट्य प्रशिक्षण संस्थेत पं. सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या अमृताने साकारलेली ‘ती फुलराणी’मधील मंजू आजही रसिकांच्या चांगलीच लक्षात असेल.
-
मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून लक्षणीय भूमिका साकारणाऱ्या अमृताने आतापर्यंत अत्यंत आव्हानात्मक भूमिकांचे सोने केले आहे.
-
‘अवघाचि संसार’, ‘झोका’, ‘पाऊलखुणा’ आदी मालिकांमधील तिच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.
-
२०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अस्तु’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला त्या वर्षीचा साहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देण्यात आला.
-
एकापेक्षा एक भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या अमृताने आपल्या लेखणीनेही त्यांची मने काबीज केली आहेत.
-
आताच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अमृताचे नाव घेतले जाते.
-
अमृताने संदेश कुलकर्णीशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला नुकतीच १७ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – अमृता सुभाष / इन्स्टाग्राम)

Pahalgam Terrorist Attack : “माझ्या नवऱ्यावर दहशतवाद्यांनी पहिली गोळी झाडली, सरकारने…”, शुभम द्विवेदीच्या पत्नीची मागणी काय?