-
बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा काल म्हणजेच १३ मे रोजी 'राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रतिक्षा गेल्या वर्षभरापासून सलमानचे चाहते करत होते. Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
प्रदर्शित होताच लाखो चाहते एकाच वेळी चित्रपट पाहू लागले. त्यामुळे सर्व्हर क्रॅश झाला. तर, दुसऱ्याबाजूला अनेकांना हा चित्रपट आवडला नाही. त्या नेटकऱ्यांनी ट्विटरवर सलमान आणि दिग्दर्शक प्रभुदेवाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
-
सगळ्यात पहिले ट्वीट हे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांचे आहे. "एका शब्दात राधे विषयी सांगायचे झाले तर, निराशाजनक. ज्या अपेक्षा होत्या त्यांची पूर्तता करता आली नाही..नवीन पटकथेसह तयार केलेल्या या चित्रपटात झालेल्या गोष्टी पुन्हा दाखवण्यात आल्या. सलमानचे काम उत्तम आहे. मात्र, निराशाजनक पटकथेमुळे हा चित्रपट मध्येच थांबला आहे…हे फक्त सलमानच्या चाहत्यांसाठी," असे ट्वीट त्यांनी केले आहे.
-
तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने श्री रेड्डीने देखील ट्वीट करत प्रभुदेवाला ट्रोल केले आहे. "एका ओळीत जर चित्रपटाबद्दल सांगायचं असेल तर, चित्रपटाच्या इतिहासातली सगळ्यात वाईट चित्रीकरण केलेल्या चित्रपटांपैकी एक, सलमानचा अभिनय अप्रतिम पण प्रभुदेवाने संपूर्ण चित्रपटाला खराब केले, सर्वात वाईट पटकथा, सर्वात वाईट दिग्दर्शन, ही फक्त कचऱ्याचे पेटी आहे शी शी, असे ट्वीट श्री रेड्डीने केले आहे."
-
एक नेटकरी म्हणाला, "जे लोक प्रभुदेवा आणि सलमानच्या राधेला बघतं आहेत. ते म्हणतात शी"
-
तर दुसरा म्हणाला, "राधे अलिकडच्या काळात सलमान खानचा सगळ्यात वाईट चित्रपट, चुकीचे लेखन, कंटाळवाणी पटकथा, प्रभुदेवाने दिशाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले. दिशा पटानी काही कामाची नाही. सलमान खानच्या उपस्थितीशिवाय काही नवीन नाही."
-
तिसरा नेटकरी म्हणाला, "सलमान खानने प्रभुदेवासोबत कोणताच चित्रपट केला नाही पाहिजे. तो बहुधा भारतातील सगळ्यात वाईट दिग्दर्शक आहे."
-
एक नेटकरी म्हणाला, "चित्रपट का पाहू नये, प्रभुदेवाचे वाईट दिग्दर्शन, पटकथा खूप खराब आहे. शेवट खराब, विजयमौर्य यांनी लिहिलेली वाईट पटकथा, जॅकी श्रॉफ आणि भरतसारख्या चांगल्या कलाकारांची भूमिका चांगली दाखवता आली नाही."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "बॉलिवूड असे चित्रपट तयार करणे थांबवा आणि ते पैसे कोव्हिड रिलीफ फंडला द्या…भारत तुमचे आभारी असेल…"
-
तिसरा नेटकरी म्हणाला, "राधे चित्रपट पाहण्याऐवजी करोनाने मरणे चांगले"

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड