-
सलमाम खानचा 'राधे-युवर मोस्ट वॉन्टेड' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात सलमानची दमदार अॅक्शन पाहायला मिळतेय. मात्र सिनेमातील काही अॅक्शन सीनसाठी सलमानचा बॉडी डबलची म्हणजेच स्टंट मॅनची मदत घेतली गेलीय. सलमानचा बॉडी डबल परवेज काजीने सोशल मीडियावर सलमानसोबत एक फोटो शेअर केलाय. राधेच्या सेटवरील हा फोटो असून यात दोघांनी एक सारखेच शर्ट परिधान केल्याचं दिसतंय
-
सलमान खान सारख्या लूकमळे परवेज काजी चांगलाच लोकप्रिय आहे. सलमान खनसोबत अनेक सिनेमांमध्ये परवेजने बॉडी डबल म्हणून काम केलंय. गेल्या सात वर्षांपासून परवेज सलमान खानसोबत काम करतोय. त्याने पहिल्यांदा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातून सलमानसोबत काम केलं.
-
राधे' सिनेमातही परवेजने सलमानच्या बॉडी डबलचं काम केलंय. "सलमान खानसोबत काम करणं मी कायम एन्जॉय करतो. ते मला नेहमी काम करण्याची संधी देतात. देवाच्या कृपेने राधेचं देखील शूटिंग चांगलं पार पडलं."
-
एका मुलाखतीत परवेज म्हणाला, " मी देवाचा आभारी आहे की त्यांनी मला सलमान खानसारखं रुप दिलं. मला सगळेकडे चांगला रिस्पॉन्स मिळतो. मला दुरून पाहून तर अनेक जर गोंधळात पडतात. लोक बऱ्याचदा वळून माझ्याकडे पाहतात. "
-
"अगदी पहिल्या दिवसापासूनच सलमान सरांना माझं काम आवडू लागलं. ते माझ्याशी हसत-खेळत वागतात. अनेक मुलाखतींमध्ये सलमान सरांनी माझं कौतुक केलंय. ते त्यांचं मोठेपण आहे."
-
परवेज स्वत: सलमान खानचा मोठा फॅन आहे. दबंग 3, भारत, रेस 3, टायगर जिंदा है आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांमध्ये परवेजने सलमानच्या बॉडी डबलचं काम केलंय. म्हणजेच सलमानचे अनेक स्टंट केले आहेत.
-
7-8 वर्षांपूर्वी परवेज वांद्रे इथं एक साधी नोकरी करायचा. यावेळी रोज ट्रेनचे धक्के खात तो मीरा-रोड ते वांद्रे असा प्रवास करायचा.
-
13 वर्षांचा असल्यापासूनच परवेज सलमान सारखा दिसू लागला. त्यानंतर वय वाढत गेलं तेव्हाही सलमान सारखा दिसत असल्याने त्याला अनेक मित्र सल्लू भाई म्हणायचे.
-
परवेजला देखील व्यायाम करण्याची आवड आहे. व्यायाम करून त्याने सलमानसारखी फिट बॉडी बनवली आहे. परवेज एका मुलाखतीत म्हणाला, "प्रेम रतन धन पायोच्या सिनेमावेळी मी खूप बालिश होतो. तेव्हा सलमान सर म्हणाले, बेटा तू फक्त तुझ्या बॉडीकडे लक्ष दे. मी जिथेही जाईन तुला सोबत घेऊन जाईन. मला विश्वास देखील होत नाही की मी एवढ्या मोठ्या स्टारसोबत काम करतोय. ते जे खातात तेच मलाही देतात. हे सर्व एका परिकथेप्रमाणे आहे.
-
परवेजने सलमानसोबत अनेकदा स्क्रीन शेअर केलीय. (all photos- instagram@parvezzkazii)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल