-
सध्याचे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणून अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे ओळखले जातात.
-
ते सतत एकत्र डिनर डेटला जाताना, सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात.
-
मलायकाही अभिनेता अरबाज खानची पत्नी होती. २०१७मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
-
१८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले.
-
त्यानंतर अर्जुन मलायकाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
पण जेव्हा अर्जुन मलायकाला डेट करत आहे हे अनेकांना काळाले तेव्हा दोघांनाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते.
-
अनेकांनी अर्जुनला वडील बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या नात्याची आठवण करुन दिली होती.
-
एका युजरने 'अर्जुनच्या वडिलांनी जे मोना मॅडमसोबत केले तेच अर्जुन आता करत आहे. वडिलांनी केले तर वाईट वाटले आणि स्वत: केले तर वाईट वाटले नाही' असे म्हटले होते.
-
तर दुसऱ्या एका युजरने, 'हा नेहमी श्रीदेवीला घर तोडणारी म्हणत होता. पण आता स्वत:ने अरबाजचे घर तोडले. हे लोकं जे बोलतात ते करत नाही…' असे म्हणत अर्जुनला सुनावले होते.
-
त्यावेळी मलायकाला देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते.
-
पण मलायका आणि अर्जुनने कधीही या ट्रोलिंगकडे फारसं लक्ष दिलं नाही.
-
ते दोघ लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
काही दिवसांपूर्वी मलायकाने आणि अर्जुनचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
पण या सर्व अफवा असल्याचे नंतर समोर आले.
-
मलायका आणि अर्जुन कधी लग्नबंधनात अडकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”