-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या लेकीचा आज वाढदिवस आहे. सुहाना खान आज तिचा २१ वा वाढदिवस साजरा करतेय. गौरी आणि शाहरुखची मुलगी सुहाना सोशल मीडियावर सक्रिय आहे. सुहानाच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजावर लाखो चाहते फिदा आहेत.
-
इतर स्टार किडस् प्रमाणेच सुहाना बॉलिवूडमध्ये कधी एण्ट्री करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. सध्या सुहाना अमेरिकेत फिल्म मेकिंग आणि अभिनयाचे धडे घेतेय.
-
सुहाना आणि शाहरुखमध्ये अगदी जवळीक आहे. सुहानाच्या बाबतीत शाहरुख चांगलाच प्रोटेक्विव्ह आहे. एका मुलाखतीत शाहरुखनेच याचा खुलासा केला होता. सुहानाला डेट करणाऱ्या मुलासाठी शाहरुखने ७ नियम तयार केले असून ते त्याला पाळावे लागतील याचा त्याने खुलासा केला होता.
-
२०१७ मध्ये 'फेमिना' या प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने हे ७ नियम सांगितले होते. यात पहिली अट म्हणजे त्या मुलाकडे नोकरी असणं गरजेचं आहे.
-
दुसरा नियम म्हणजे कायम असं समज की मला तू आवडत नाही.
-
शाहरुखने स्वत: हे नियम तयार केल्याचं त्याने सांगितलं. यातील तिसरा नियम म्हणजे "मी कायम तुझ्यावर नजर ठेवीन."
-
यातील चौथा नियम म्हणजे " माझा वकिल कायम सोबत असेल". तर आठवा आणि तितकाच महत्वाचा नियम म्हणजे. "लक्षात ठेवायचं ती माझी राजकुमारी आहे. तू तिला जिंकलेलं नाही."
-
"जर तिला त्रास दिला तर लक्षात ठेव मला जेलमध्ये जाण्याची चिंता नाही." असा नियम सांगत शाहरुखने मुलीला त्रास दिल्यास त्या मुलाला मोठी शिक्षा भोगावी लागेल हे सुचवलं आहे. शाहरुख त्या मुलाचा जीव देखील घेऊ शकतो. त्यासाठी त्याला जेलमध्ये जावं लागलं तरी हरकत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
-
सातवा नियम म्हणजे, "जसं तू तिच्याशी वागशील तसचं मी तुझ्याशी वागेल." असं म्हणत शाहरुखने सुहानाला डेट करू इच्छिणाऱ्या मुलांना धमकी वजा सचूना दिल्या आहेत.
-
असं असलं तरी शाहरुखने एनडीव्हीच्या एका कार्यक्रमात हे नियम म्हणजे मजा-मस्ती असल्याचं म्हंटलं होतं. "जेव्हा सुहाना एखाद्या मुलाला पसंत करू लागेल तेव्हा कादाचित मी काहीच बोलू शकणार नाही. मी त्याचा स्विकार करेन" असं शाहरुख म्हणाला होता. (all photo-instagram@suhanakhan2/iamsrk/gaurikhan/)
-

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल