-
परदेशातील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. यातील काहींना प्रेक्षांनी मोठी पसंती दिली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्यांनी जम बसवला. तर काही अभिनेत्रींनी मात्र एखाद दुसरा सिनेमा केल्यानंतर बॉलिवूडकडे पाठ फिरवली. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे बारबरा मोरी. हृतिक रोशनसोबत 'काइट्स' सिनेमात बारबरा झळकली होती.
-
'काइटस्' सिनेमाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नव्हती. तसचं या सिनेमानंतर बारबराने बॉलिवूडकडे पाठ फिरवली. मात्र मॅक्सिकन सिनेमांमधून तिने अभिनय करणं सुरू ठेवलं.
-
काइटस् सिनेमात बारबरा आणि हृतिकचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या सौदर्याने अनेकांचं लक्ष वेधलं होतं.
-
बारबराचा जन्म २ जानेवारी १९७८ साली झाला असून आता ती ४३ वर्षांची आहे. मात्र अवघ्या ३८ वर्षांची असतानाच बारबरा आजी झाली आहे. जवळपास १७ वर्षांची असताना बारबरा सर्जिओ मेयर या मेक्सिकन अभिनेत्यासोबत रिलेशन शिपमध्ये होती. यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला. सर्जिओ मेयर मोरी असं तिच्या मुलाचं नाव आहे.
-
बारबराचा मुलगा देखील आता मोठा झाला असून त्याला एक सहा वर्षाची मुलगी आहे. जिचं नाव मिला आहे. मीलाच्या जन्मावेळी बारबरा फक्त ३८ वर्षांची होती. म्हणजेच अवघ्या ३८ व्या वर्षी ती आजी झाली आहे.
-
सर्जिओ मेयर सोबत काही वर्षांनी बारबरा विभक्त झाली. त्यानंतर २०१६ मध्ये तिने बास्केटबॉल खेळाडू Kenneth Ray Sigman सोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न देखील फार काळ टिकलं नाही. २०१७ मध्ये बारबरा आणि केनेथ विभक्त झाले.
-
सोशल मीडियावर बारबरा सक्रिय असून अनेक पोस्ट ती शेअर करत असते. (all photo-instagram@delamori)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल