-
बॉलिवूड अभिनेत्री रेखा या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. रेखा यांचे लाखो चाहते आहेत. रेखा या फक्त त्यांच्या चित्रपटामुळे नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असायच्या. एकदा तर रेखा या अभिनेता संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
-
१९८४ मध्ये 'जमीन आसमान' या चित्रपटात रेखा आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केलं. या चित्रपटात रेखा या संजय दत्तच्या आईची भूमिका साकारत होत्या.
-
एका वृत्तानुसार, या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान, हे दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे. त्यानंतर या दोघांनी गपचूप लग्न केलं अशा चर्चा सुरु झाल्या.
-
ही बातमी मिळताच सुनील दत्त यांनी संजय दत्तला सांगितले की करिअरकडे लक्ष दे. मात्र, संजयने लक्ष दिले नाही.
-
त्यानंतर सुनील दत्त यांनी शेवटी रेखा यांची मदत घेतली. सुनील दत्त यांनी रेखायांची भेट घेतली आणि संजय दत्त पासून लांब रहाण्याचा सल्ला दिला.
-
काही दिवसांनंतर रेखाने एक पत्रकार परिषद घेतली. त्यात रेखा म्हणाल्या, "संजय दत्तसोबत मी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या या चर्चा खोट्या आहेत."
-
एवढंच नाही तर स्वत: संजय दत्तने देखील पत्रकार परिषद घेतली होती. त्या परिषदेत या सगळ्या अफवा असल्याचे संजयने स्पष्ट केले होते.
-
दरम्यान, रेखा यांच्या जीवनावर आधारीत 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर रेखा या संजय दत्तच्या नावाचा सिंदूर लावतात अशा अफवा सुरु झाल्या होत्या.
-
मात्र, या पुस्तकाचे लेखक यासिर उस्मान यांनी पुढे येऊन हे सगळं खोटं असल्याच सांगितलं.
-
या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण देतं यासिर म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट त्या पुस्तकात नाही. लोक नीट वाचत नाही आहेत.
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन