-
एका मुलाखतीत अभिनेत्री किश्वर मर्चंटने तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्यचा खुलासा केलाय. किश्वर एका मोठ्या स्टार आणि निर्मात्यासोबत काम करणार होती. मात्र निर्मात्याच्या अटीमुळे किश्वरने हा सिनेमा नाकारल्याचं तिने या मुलाखतीत स्पष्ट केलंय.
-
किश्वर लवकरच आई होणार आहे. या मुलाखतीत तिने तिच्या गरोदरपणाबद्दल तसचं पती सुयश रायविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या.
-
किश्वरने 'भेजा फ्राय' आणि 'हम तुम और शबाना' य़ा सिनेमांमध्ये काम केलंय. या मुलाखतीत किश्वरला कास्टिंग काउचबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, "होय हे माझ्यासोबत एकदा घडलं. मी एका मिटींगला गेले होते तेव्हा. यावेळी माझी आईदेखील माझ्यासोबत होती."
-
किश्वर म्हणाली, " मला सांगितलं गेलं की मला अभिनेत्यासोबत एक रात्र घालवावी लागेल. मी ती ऑफर नाकारली आणि आम्ही घरी आलो. मी असं नाही म्हणणार की हे खूप नॉर्मल आहे. सिनेसृष्टीच नाही अनेक क्षेत्रात हे होतं." यावेळी किश्वरने निर्माता आणि अभिनेत्याचं नावं सांगितलं नसलं तरी ते खूप लोकप्रिय असल्याचा खुलासा केला.
-
पुढे किश्वर म्हणली, "कास्टिंग काउचच्या या अनुभवानंतरही मी मागे हटले नाही. माझा कामावर फोकस होता. मी मालिकांवर लक्ष केंद्रित केलं आणि मला चांगलं कामही मिळत गेलं."
-
या मुलाखतीती किश्वरने आईबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. बाळाचा विचार करण्यासाठी आई बऱ्याच दिवसांपासून समजावत असल्याच ती म्हणाली.
-
४०व्या वर्षी किश्वर आई होणार आहे. जवळपास १ वर्षाचा ब्रेक घेऊन काम परत सुरु करणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. एवढचं नाही तर घरुन पाठिंबा असल्याने जर चांगली ऑफर आली तर लवकरही काम सुरु करेन असं ती म्हणाली आहे. (all photo- instagram@ kishwersmerchantt)
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली