-
छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री जेनिफर विंगेट ही तिच्या सोशल मीडियावर हॉट फोटोज शेअर करत आपल्या फॅन्सना तिच्या सौंदर्याने घायाळ करतच असते. आपल्या अदाकारीने लाखो लोकांचे मन जिंकणाऱ्या जेनिफर विंगेटचा आज वाढदिवस आहे. ३० मे १९८५ मध्ये मुंबईतल्या गोरेगाव इथे तिचा जन्म झाला. आज ती तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करतेय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'सरस्वतीचंद्र' या मालिकेतून अभिनेत्री जेनिफर विंगेटने आपल्या दमदार अभिनयाचा परिचय दिला होता.
-
अभिनेत्री जेनिफरने वयाच्या १२ व्या वर्षीच 'राजा को रानी से प्यार हो गया' या चित्रपटात एका बालकलाकाराच्या रूपाने तिच्या करियरला सुरवात केली. त्यानंतर तिच्या १४ व्या वर्षी ती 'कुछ ना कहो' चित्रपटातून पुन्हा एकदा बालकलाकाराच्या भूमिकेतून झळकली. त्यानंतर ती एका अभिनेत्रीच्या रूपातून वेगवेगळ्या टीव्ही मालिकांमधून समोर आली.
-
अभिनेत्री जेनिफरला टीव्ही इंडस्ट्रीत 'कार्तिका' शोमधून लीड रोलसाठी मोठा ब्रेक मिळाला होता. यात तिने संघर्ष करणाऱ्या एका गायिकेची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने 'कसौटी जिंदगी की' मालिकामध्ये काम केलं.
-
'दिल मिल गए', 'सरस्वतीचंद्र', आणि 'बेहद' सारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेली जेनिफरचं प्रोफेशनल लाइफ पेक्षा तिची पर्सनल लाइफ जास्त इंटरेस्टींग ठरली आहे.
-
'दिल मिल गए' ही ती मालिका होती, ज्या मालिकेच्या लोकप्रियतेसोबतच जेनिफर आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांचं प्रेमप्रकरण देखील गाजलं. मालिकामधल्या या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनीही मोठी पसंती दर्शवली. याच मालिकेत दोघांमध्ये रोमान्स देखील दिसून आला.
-
कित्येक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर २०१२ साली जेनिफरने अभिनेता करण सिंह ग्रोव्हरसोबत लग्न केलं. लग्नानंतर सुद्धा दोघांमध्ये पहिल्यापेक्षा जास्त बॉन्डिंग दिसून आली. अनेक मुलाखतीत त्यांनी एकमेकांसाठीचं प्रेम व्यक्त केलंय. एकदा तर नॅशनल टेलिव्हिजनवरच दोघांनी एकमेकांना किस केलं होतं.
-
जेनिफरसोबत लग्न केल्यानंतर त्याने टीव्ही इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवायला सुरवात केली. यात त्याला अभिनेत्री बिपाशा बासू सोबत 'अलोन' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात बिपाशा बासू आणि करण दोघांमध्ये बरेच इंटीमेट सीन्स शूट झाले होते. या चित्रपटाची शूटिंग सुरू असतानाच करण आणि बिपाशाच्या अफेयरची चर्चा वाऱ्यासारखी पसरू लागली. तर दुसरीकडे पत्नी जेनिफरसोबत करण थोडा दुरावाच ठेवताना दिसून आला.
-
त्यानंतर लग्नाच्या दोन वर्षातच टीव्ही इंडस्ट्रीतले बेस्ट कपल ठरलेल्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. टीव्ही इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त पेमेंट घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये जेनिफरचं नाव घेतलं जातं. पण करणपासून वेगळं झाल्यानंतर जेनिफर पूर्णपणे मनाने आतून तुटून गेली होती. तिने यातून स्वतःला सावरायला जवळजवळ दोन वर्ष घेतली.
-
करणसोबत वेगळं झाल्याच्या दुःखातून सावरून अखेर दोन वर्षानंतर म्हणजेच २०१६ साली 'बेहद' मालिकेतून तिने पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री केली. यात तिने एक निगेटिव्ह रोल करत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.
-
'बेहद' मधून तिला इतकी लोकप्रियता मिळाली की आता करण सिंह ग्रोव्हरच्या एका दिवसाच्या कमाई पेक्षा जेनिफर जास्त कमाई करत आहे. जेनिफर आधी एका मालिकेसाठी ८० ते ८५ हजार रूपये घेत होती. तिची हीच रक्कम आता वाढून जवळपास १ लाखांपर्यंत पोहोचली आहे. (सर्व फोटो सौजन्य : जेनिफर विंगेट/ इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…