-
अभिनेते परेश रावल आज त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. कधी व्हिलन तर कधी कॉमेडी अशा विविध भूमिका साकारत परेश रावल यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण काही त्यांने न पाहिलेले फोटो पाहणार आहोत.
-
१९८५ सालात आलेल्या 'अर्जुन' या सिनेमातून परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र १९८६ सालामध्येमध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' या चित्रपटाने त्यांना उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळाली.
-
1994 सालात आलेल्या सरदर वल्लभभाई पटेल यांच्या बायपिकमध्ये परेश रावल यांनी साकारलेली मुख्य भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे त्यांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आलं.
-
'कृष्ण अवतार' या सिनेमातील परेश रावल यांचा लूक. या सिनेमात त्यांची व्हिलनची भूमिका होती.
-
२००० सालात आलेल्या 'हेरा फेरी' या सिनेमातील परेश रावल यांची बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका सिनेमा इतकीच सुपरहीट ठरली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरचा बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड मिळाला होता. तर २००६ मध्ये आलेल्या या सिनेमाच्या सिक्वलमध्येही परेश रावल यांच्या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळाली.
-
परेश रावल यांनी अनेक सिनेमांमधून विनोदी भूमिका साकारल्या आहेत. यात अंदाज अपना-अपना, चाची 420, नायक, आवारा पागल दिवाना, हलचल, गरम मसाला, भूलभुलैया, वेलकम आणि अशा अनेक सिनेमांमधून परेश रावल यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
परेश रावल हे मुंबईतील विलेपार्ले इथल्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आहेत.
-
परेश रावल हे भारतीय संसदेचे खासदार होते. भारतीय जनता पक्षासाठी ते कार्यरत होते.
-
परेश आणि स्वरूप यांना आदित्य आणि अनिरुद्ध ही दोन मुलं आहेत.
-
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास परेश रावल यांनी स्वरुप संपत यांच्याशी विवाह केला आहे. त्या एक अभिनेत्री होत्या. तसचं १९७९ साली त्यांनी मिस इंडियाचा मुकुट पटकावला आहे.
-
परेश रावल सोशल मीडियावर सक्रिय असतात. देशातील विविध मुद्द्यांवर ते त्यांचं मत मांडत असतात.(all photo- Express Archive)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी